आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेमध्ये शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश 

जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेमध्ये शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश 

राशिवडे :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क. 
कसबा तारळे येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धेमध्ये कसबा तारळे येथील शिवाजी हायस्कूलच्या चौदा वर्षांखालील मुलींच्या संघाने पहिल्याच प्रयत्नात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच 14 व 17 वर्षाखालील मुलांनीही यश संपादन केले आहे. 
17 वर्षाखालील मुली या गटात संयोजा जाधव व श्रेया सावेकर यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. 
17 वर्षाखालील मुले या गटात तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या कार्तिक पोवार, हर्षद पोवार, व पृथ्वीराज चौगले या 3 विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे 
14 वर्षाखालील मुले या गटात तृतीय क्रमांक मिळवत वेदांत गुडाळे व रोहित कांबळे यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंना रेडीएंट स्कूल कोदवडेचे क्रीडा शिक्षक संदीप पांडुरंग पाटील यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक आर. जी. पाटील, सुनील कांबळे,राजेंद्र पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??