ताज्या घडामोडी

अक्कलकोट तालुक्यातील आश्रम शाळांमध्ये अनागोंदी कारभार अनेक शाळेतील विद्यार्थी उपाशी :आश्रम शाळेचे मुख्याध्यापक निलंबित

अक्कलकोट तालुक्यातील आश्रम शाळांमध्ये अनागोंदी कारभार


अनेक शाळेतील विद्यार्थी उपाशी :आश्रम शाळेचे मुख्याध्यापक हडपद यांना निलंबित


एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
अक्कलकोट तालुक्यातील अनेक आश्रम शाळांमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून अनेक शाळेतील विद्यार्थी उपाशी अन्न पाण्याविना उपाशी राहत असल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने केलेल्या पाहणी मध्ये आढळून आला असून यामुळे कोन्हाळी येथील आश्रम शाळेचे मुख्याध्यापक हडपद यांना निलंबित करण्यात आले असून या आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामुळे सोलापुर जिल्ह्यात राजकारणी मंडळी मार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रम शाळा चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे
अनेक आश्रम शाळांमध्ये बोगस विद्यार्थी असून कर्नाटक गोवा आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश येथील तसेच इतर राज्यातील विद्यार्थी या आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी आणि साफळे येथील आश्रम शाळांमध्ये मोठा अनागोंदी कारभार सुरू असून अक्कलकोट तालुक्यातील साफळे
येथील महादेव काशीराया पाटील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचा अभ्यास घेताना आ. तथा महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुहास कांदे आदी नी भेट देऊन पाहणी केली यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
कोन्हाळी येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले असून विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या भेटीत त्रुटी उघड झाल्या आहेत.

महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी आणि साफळे येथील आश्रमशाळेस भेटी दिल्या. यावेळी त्यांना शाळेत भौतिक सुविधांचा अभाव, शैक्षणिक गुणवत्ता नसल्याने दिसले. त्यामुळे समितीने कोन्हाळी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सिद्रमप्पा हडपद यांना निलंबित करण्याचे आदेश दिले, तसेच साफळे आश्रमशाळेवर प्रशासक नेमण्याचा आदेश दिला.

समिती मंगळवार (दि. 19) ते गुरुवार (दि. 21) या दरम्यान सोलापूर जिल्हा दौर्‍यावर आहे. समिती प्रमुख आ. सुहास कांदे यांनी मंगळवारी सकाळी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर समितीने अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी येथील (कै.) पशुराम जाधव आश्रम शाळेला भेट दिली. तेव्हा याठिकाणी भौतिक सुविधांचा अभाव, अनेक विद्यार्थी अभ्यासात कच्चे तसेच शैक्षणिक गुणवत्ता फारच घसरल्याचे कारण देत मुख्याध्यापक सिद्रमप्पा हडपद यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

यानंतर समितीने साफळे येथील महादेव काशीराया पाटील आश्रम शाळेस भेट दिली. याठिकाणीही पाहणीत अनेक त्रुटी आढळल्याने शाळेवर प्रशासक नेमण्याचे आदेश समिती प्रमुखांनी दिला.यावेळी महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे सदस्य आ. उमेश यावलकर, आ. देवेंद्र कोठे, आ. प्रवीण स्वामी, आ. अनिल मांगुळकर, आ. अमोल मिटकरी, आ. धीरज लिंगाडे उपस्थित होते.

अक्कलकोट तालुक्यातील दोन आश्रम शाळांना भेटी दिल्या. शाळेत भौतिक सुविधांचा अभाव, विद्यार्थी अभ्यासात कच्चे दिसून आले. त्यामुळे कोन्हाळी आश्रम शाळा मुख्याध्यापकांच्या निलंबनाचे आदेश दिले. साफळे येथील आश्रमशाळेवर प्रशासक नेमण्याचा आदेश दिला.
– आ. सुहास कांदे, अध्यक्ष, विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??