ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंधुदुर्गचे भूमिपुत्र अमित जामसंडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून निवड.

सिंधुदुर्गचे भूमिपुत्र अमित जामसंडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून निवड.


देवगड:
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
सर्वोच्च न्यायालयाच्या निवड समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश या पदासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र अमित सत्यवान जामसंडेकर यांची निवड केलेली आहे.

मुंबई येथून कायद्याची पदवी इंग्लंड येथून पदव्युत्तर पदवी व इतर विशेष पदव्यांचे शिक्षण घेतलेले अमित जामसंडेकर गेल्या 28 वर्षांपासून नामांकित वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम न्यायमूर्ती होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे.

अमित हे बौद्धिक संपदा अधिकार या विषयात मोजक्या असलेल्या तज्ज्ञ वकिलांपैकी एक आहेत. 26 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत त्यांनी ट्रेडमार्क, पेटंट, कॉपीराइट, गोपनीय माहिती, भौगोलिक संकेत, लवाद आणि इतर व्यावसायिक कायद्यांचा समावेश असलेले खटले भारतात दाखल केले आहेत.

सिंधुदुर्गातील देवगडसारख्या ग्रामीण भागात पदवीचे शिक्षण घेतलेले अमित यांनी आपले कायद्याच्या पदवीचे शिक्षण शासकीय विधी महाविद्यालयातून पूर्ण केले व पदव्युत्तर पदवीसाठी ते इंग्लंड येथे गेले.आपल्या वकिलीच्या कारकीर्दीला त्यांनी 1998 मध्ये मुंबई आणि गोवा न्यायालयातून सुरुवात केली त्यानंतर 2002 मध्ये ते सुप्रीम कोर्ट इंग्लंड येथील सॉलिसिटर जर्नल म्हणून लंडन येथे त्यांनी कामकाजास सुरुवात केली . कार्डिफ विद्यापीठ इंग्लंड येथून त्यांनी बौद्धिक संपदा कायदा या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली तसेच सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम पाहिले.यानंतर लेस्टर विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवलेली आहे. बौद्धिक संपदा या विषयात अतिशय मोजके लोक वकील म्हणून कार्यरत आहेत त्यापैकी एक ज्येष्ठ विधीज्ञ म्हणून अमित यांची ख्याती आहे.

व्यावसायिक कायदे, कॉपीराईट, पेटंट अशा विविध क्षेत्रात त्यांनी उत्तम कार्य केलेले आहे. लंडन येथील अग्रमानांकित फोर फाय ग्रेझ इन स्क्वेअर चे सदस्य आहेत. त्याचबरोबर त्यांचे शोधप्रबंध अनेक आंतरराष्ट्रीय ठिकाणातून प्रसिद्ध झालेले आहेत युरोपियन इंटिलेक्चल लॉ रिव्ह्यू युरोपियन बौद्धिक संपदा पुनरावलोकन आणि संप्रेषण कायदा यासारख्या प्रकाशनांमध्ये लेख लिहिले आहेत आणि जर्नल ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्सचे पंच म्हणूनही काम केले आहे.

त्याचबरोबर तज्ञ व्याख्याते म्हणून त्यांची भारतात व भारताबाहेर विविध ठिकाणी व्याख्याने झालेली आहेत मुंबई अहमदाबाद इंडियन मर्चंट चेंबर या भारतातील तर; जिनिव्हा, टोकियो, जपान, सिंगापूर अशा विविध ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे.

त्याचबरोबर यांच्या कार्याचा गौरव म्हणून अमेरिका सरकारने पी. आर. व्यावसायिक म्हणून, 2008 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय अभ्यागत येल कार्यक्रमासाठी त्यांची निवड केली होती आणि अमेरिकेच्या दूतावासाने त्यांना येल वर्ल्ड फेलोशिपसाठी नामांकित केले होते.
अशा या ग्रामीण भागातून आलेल्या परंतु आपल्या बुद्धिमत्ता व कार्यकौशल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपल्या कार्याचा दबदबा उमटवणाऱ्या अमित जामसंडेकर यांच्या कार्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निवड करून त्यांना सन्मानित केलेले आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वकील म्हणून काम करताना न्यायमूर्ती म्हणून निवड झालेले हे पहिलेच वकील आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??