14 वर्षांखालील विभागीय फुटबॉल स्पर्धेत संजीवन स्कूलच्या मुलींच्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
गडहिंग्लज : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क.
जिल्हा क्रीडा कार्यालय व गडहिंग्लज क्रीडा शिक्षक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या 14 वर्षाखालील मुलींच्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत पन्हाळ्याच्या संजीवन स्कूलने अंतिम सामन्यात साताऱ्याच्या सातारा विभागाचा दोन शून्य गोलने पराभव करून विजेतेपद पटकावले. या संघाची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुलींच्या प्रथम उपांत्य सामन्यात संजीवन स्कूलने सांगलीला 5 गोलने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला व दुसर्या उपांत्य सामन्यात साताऱ्याच्या यशोदा पब्लिक स्कूलने कोल्हापूरच्या उषाराजे स्कूलचा ट्रायब्रेकरवर 4-3 ने पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामना संजीवन कोल्हापूर जिल्हा व यशोदा पब्लिक स्कूल सातारा विभाग यांच्यात झाला सदरच्या सामन्यात निशिता चनू व लिमचिंबी यांनी दोन गोल करून भक्कम आघाडी मिळवून दिली व विजेतेपद पटकावले या संघाला प्रशिक्षक अमित साळुंखे, नितीन पाटील ,संदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे चेअरमन पी.आर.भोसले सहसचिव एन.आर.भोसले क्रीडा संचालक सौरभ भोसले व क्रीडा शिक्षक जयंत कुलकर्णी व सागर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले
विजयी संघ पुढीलप्रमाणे : 
रेवा सोनवणे कर्णधार, प्रणाली पवार,अनुश्री जाधव,अनुष्का कटके,अपूर्वा नाळे, आराध्या जाधवर, हृतिका पवार,निशिता चनू,पूजा गोवाला,बंधना राम मोहन, मनस्वी माने,माही वायफळकर, लिमचिंबी,श्रावणी जाधव,श्रेया भागवत.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??