संजीवन विद्यालय येथे शालेय कार्यकारिणीच्या विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न*

संजीवन विद्यालय येथे शालेय कार्यकारिणीच्या विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न*
एनवाय नवा भारत / प्रतिनिधी, पन्हाळा
येथील संजीवन विद्यालय या निवासी प्रशालेत शालेय कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा माजी नौदल अधिकारी व संस्थेचे माजी सैनिकी प्रशिक्षक मनोहर मायणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेचे प्राचार्य महेश पाटील व वरिष्ठ समन्वयक सचिन इनामदार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.विविध पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना मान्यवरांकडून प्रमाणपत्र व पदाचे बॅजेस् समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
क्रीडा व वसतिगृह प्रमुख सागर पाटील यांनी विद्यार्थ्यांना पदाची शपथ दिली.
संगीत विभागाद्वारे देशभक्तिपर गीतगायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षीय भाषणात मनोहर मायणे यांनी भारतीय नौसेनेमधील चित्तथरारक अनुभव कथन केले व संजीवनचे अनेक विद्यार्थी भारतीय सैन्य दलात कार्यरत असल्याबाबत गौरवोद्गार काढले.
शालेय जीवनापासून वक्तशीरपणा, शिस्त, समयसूचकता हे गुण अंगी बाणवणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच संजीवन संस्थापक पी.आर. भोसले यांनी संघर्षमय परिस्थितीतून उभ्या केलेल्या कार्याचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भविष्यातील कारकीर्दीत भरीव यश मिळेल असा आशावाद व्यक्त केला.
या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष पी.आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, क्रीडा संचालक सौरभ भोसले यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी संजीवनचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद , विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय पाटील व शकुंतला कुंभार यांनी तर आभार प्रदर्शन कनिष्ठ समन्वयक सुगंध देवकुळे यांनी केले.