एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे च्या वतीने गणपतराव पाटील (दादा ) यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार प्रदान*

एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे च्या वतीने
गणपतराव पाटील (दादा ) यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार प्रदान*
एनवाय न्युज / शिरोळ प्रतिनिधी
एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे च्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा ‘पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार’ श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांना आज पुणे येथे प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते पुणेरी पगडी, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह फिरोदिया सभागृह, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्काराचे प्रदान करण्यात आला.
पर्यावरण क्षेत्रात गेली 17 वर्षे एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया ही संस्था काम करीत असून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था आणि व्यक्तींना ‘पर्यावरण भूषण’ आणि ‘पर्यावरण गौरव’ पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. शिरोळ तालुका आणि परिसरामध्ये वर्षानुवर्षे क्षारपड असलेली जमीन सुपीक करण्याच्या ध्येयाने गणपतराव पाटील यांनी घेतलेले कष्ट हे निश्चितच पर्यावरण क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत याचा विचार करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या प्रसंगी एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष आमोद घमंडे, सचिव गणेश शिरोडे व खजिनदार सचिन पाटील यांच्यासह राजेंद्र मिरजे उपाध्यक्ष विश्वेश्वरय्या बँक तसेच कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हॉइस चेअरमन शरदचंद्र पाठक कार्यकारी संचालक एम व्ही पाटील तसेच सर्व संचालक मंडळ या प्रसंगी उपस्थित होते. फोटो पुणे येथे पर्यावरण जीवनगौरव पुरस्कारसिद्धेश कदम यांच्या हस्ते गणपतराव पाटील यांना प्रदान करण्यात आला.