कृषी व व्यापारताज्या घडामोडीदेश विदेश

सिमकार्ड फोनमधून काढले, तर व्हॉट्सअ‍ॅपसह इतरही मेसेजिंग अ‍ॅप्स बंद पडणार : भारत सरकारचे मेसेजिंग अ‍ॅप्ससाठी नवे नियम – 

सिमकार्ड फोनमधून काढले, तर व्हॉट्सअ‍ॅपसह इतरही मेसेजिंग अ‍ॅप्स बंद पडणार : भारत सरकारचे मेसेजिंग अ‍ॅप्ससाठी नवे नियम – 

वृत्तसेवा: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

भारत सरकारने देशात मेसेजिंग अ‍ॅप वापरात सुरक्षितता वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने व्हॉट्सअ‍ॅप, सिग्नल, टेलिग्राम आणि इतर मेसेजिंग सेवांसाठी नवीन नियम जारी केले असून, आता प्रत्येक खातं सक्रिय सिमकार्डशी कायम जोडलेलं असणं बंधनकारक राहील.नव्या नियमानुसार, जर वापरकर्त्याने सिमकार्ड फोनमधून काढले, बदलले किंवा ते निष्क्रिय झाले, तर संबंधित मेसेजिंग अ‍ॅप आपोआप काम करणे थांबवेल. म्हणजेच, सिमशिवाय किंवा निष्क्रिय क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर अ‍ॅप वापरणं शक्य राहणार नाही.वेब व्हर्जनवरही अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था सरकारच्या आदेशानुसार, मेसेजिंग अप्सच्या वेब व्हर्जनवर  म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप वेबवरही दर सहा तासांनी वापरकर्त्याला लॉगआऊट करण्यात येईल.

ही पाऊल वापरकर्त्यांच्या माहितीवरील संभाव्य गैरवापर आणि फसवणुकीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी उचलले गेले आहे.

 सरकारने या नियमांच्या अंमलबजावणीसाठी सर्व कंपन्यांना पुढील तीन महिन्यांची मुदत दिली आहे. या कालावधीत प्लॅटफॉर्मना त्यांच्या सिस्टीममध्ये आवश्यक बदल करून नवे नियम लागू करावे लागतील 

अधिकाऱ्यांच्या मते, या निर्णयामागे ऑनलाइन फसवणूक, बनावट खाते आणि आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश आहे. अनेक वेळा सिम बदलून अथवा निष्क्रिय क्रमांकावरून फसवणूक करणाऱ्यांनी नवे खाते तयार केले जाते, त्यामुळे अशा तक्रारींची संख्या वाढत चालली होती.

यामुळे वापरकर्त्यांसाठी काही गैरसोयीही होऊ शकतात सध्या देशात सुमारे ५० कोटीपेक्षा अधिक व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते आहेत. नव्या नियमामुळे त्यांना स्वतःचे सिमकार्ड कायम एका ठराविक डिव्हाइसवर ठेवावे लागेल. हे वारंवार फोन बदलणाऱ्या किंवा दुहेरी सिम वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी थोडंसं अडचणीचं ठरू शकतं. तरीही, तज्ज्ञांच्या मते सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रयत्न स्वागतार्ह आहे आणि यामुळे डिजिटल फसवणूक मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??