आपला जिल्हाताज्या घडामोडी

सतत परिश्रम हिच यशाची गुरुकिल्ली मा.कृष्णाजी बोहरा : ” स्कॉलरशिप व एम.टी.एस. परीक्षेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलचे भरघोस यश “

सतत परिश्रम हिच यशाची गुरुकिल्ली मा.कृष्णाजी बोहरा :

स्कॉलरशिप व एम.टी.एस. परीक्षेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलचे भरघोस यश “

इचलकरंजी: एन. वाय. नवा भारत लाईव्ह न्यूज
येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी सन 2024- 25 च्या शिष्यवृत्ती परीक्षेत व महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत भरघोस यश संपादन केले. एकूण चार विद्यार्थिनींनी एम. टी .एस. व तीन विद्यार्थिनींनी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. या यशस्वी विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा प्रशालेत संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी आपल्या स्वागत व प्रास्ताविकाच्या मनोगतात शाळेच्या मुख्याध्यापिका मा.ए.एस.काजी यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींच्या परिश्रमाचे व पालकांच्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल शिक्षकांचे कौतुक केले व मान्यवरांचे स्वागत केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.कृष्णाजी बोहरा शेठजी यांनी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनींचे, शिक्षकांचे अभिनंदन करून मुलींना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.संस्थेचे ट्रेझरर मा.महेश बांदवलकर यांनी विद्यार्थिनी व पालकांचे अभिनंदन केले.यावेळी स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात 10 वी व एम. टी.एस.मध्ये राज्यात चौथी आल्याबद्दल कु.संस्कृती संतोष आबाळे हिचा तसेच कु.ईशा विनायक कांबळे स्कॉलरशिप मध्ये जिल्ह्यात 41वी,एम. टी.एस.मध्ये राज्यात 12 वी,कु. गार्गी संभाजी पोवार जिल्ह्यात 58 वी,तालुकास्तरीय बक्षीस,कु.जान्हवी प्रशांत कुरुंदवाडे एम.टी.एस.परीक्षेत विशेष बक्षीस प्राप्त केल्याबद्दल सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींचा व त्यांच्या पालकांचा सत्कार संस्थेचे चेअरमन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कृष्णाजी बोहरा,स्कूल कमिटी चेअरमन मा.मारुतरावजी निमणकर,ऑन.सेक्रेटरी मा. बाबासाहेब वडिंगे,विश्वस्त मा.अहमद मुजावर, ट्रेझरर मा. महेश बांदवलकर, मुख्याध्यापिका मा.ए.एस.काजी या मान्यवरांच्या शुभहस्ते तसेच उपप्राचार्य मा.व्हि.जी.पंतोजी,पर्यवेक्षिका मा.व्हि.एस.लोटके, मा.एस.एस.कोळी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी कु.संस्कृती आबाळे व तिचे पालक संतोष आबाळे यांनी मनोगत व्यक्त केले.आभार पर्यवेक्षिका व्ही.एस.लोटके यांनी मानले.अहवाल वाचन व सूत्रसंचालन विभाग प्रमुख आर.एस.रॉड्रीग्युस यांनी केले.यावेळी एम.टी.एस प्रमुख बी.बी.रायनाडे,मार्गदर्शक शिक्षक एस.पी.धातूंडे,श्रीमती एम.एस. पाटील,.जी.एस.भमणगे, ए.ए.शिंदे,पी.ए.कोल्हापुरेआर.एम.गरड,श्री.एम.आर.चव्हाण यांच्यासह पालक,सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थिनी या कौतुक सोहळ्यास उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??