नवा भारत न्यूज या न्यूज पोर्टलमुळे सामान्यांना न्याय मिळेल – गणपतराव दादा पाटील

नवा भारत न्यूज या न्यूज पोर्टलमुळे सामान्यांना न्याय मिळेल
– गणपतराव दादा पाटील
एनवाय नवा भारत न्यूज / शिरोळ :
नवा भारत न्यूज या न्यूज पोर्टलमुळे सामान्यांना न्याय मिळेल व शिरोळ तालुक्यातील बातम्या वेगाने सर्वदूर पोहोचतील असा विश्वास श्री दत्त उद्योग समूहाचे नेते उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी व्यक्त केले.
एन वाय नवा भारत या न्यूज पोर्टल चे उद्घाटन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर गणपतराव पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले त्या प्रसंगी ते बोलत होते न्यूज पोर्टलचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार यांनी वृत्तपत्रातील ट्रेडर मशीन ते न्यूज पोर्टल पर्यंतच्या आपल्या प्रवासाची माहिती यावेळी दिली व नव्या युगाचा नवा भारत साप्ताहिकाप्रमाणेच एन माय न्यूज पोर्टल ला ही सर्वांची साथ मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादा काळे मासिक इंद्रधनुष्याचे कार्यकारी संपादक संजय सुतार, पत्रकार दगडू माने, चंद्रकांत भाट सयाजी शिंदे तसेच आबा जगदाळे श्याम वाघमोडे साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.