दत्त सेवकांची पतसंस्थेत 7 कोटी 56 लाख रुपये निधीचा अपहार केल्याची फिर्याद* *10 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल*

दत्त सेवकांची पतसंस्थेत 7 कोटी 56 लाख रुपये निधीचा अपहार केल्याची फिर्याद*
*10 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल*
जयसिंगपूर:एन वाय नवा भारत
येथील श्री दत्त शासकीय सेवकांची पतसंस्थेत 7 कोटी 56 लाख 56 हजार 117 रुपये निधीचा अपहार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संस्थेचे चेअरमन, संचालक, मॅनेजर, शाखाधिकारी व कर्जदार अशा 10 जणांविरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद लेखपरीक्षक सहकारी संस्था शिरोळचे सुभाष दादासाहेब देशमुख (रा.गावडे गल्ली, शिरोळ) यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे.
याप्रकरणी चेअरमन अनिलकुमार महादेव तराळ (रा.गल्ली नं.12, जयसिंगपूर), संचालक प्रमोद मनोहर जाधव (रा.गल्ली नं.2, स्टेशन रोड, जयसिंगपूर), संचालक बाळासो दत्तू लोहार (रा.अतिग्रे, ता.हातकणंगले), संचालक रेखा महादेव तराळ (रा.हेरवाड, ता.शिरोळ), कर्जदार अनिल बाळासो घोलप (रा.हेरवाड, ता.शिरोळ), कर्जदार रावसाहेब भूपाल कोळी (रा.शाहूनगर, जयसिंगपूर), कर्जदार वैशाली अनिलकुमार तराळ (रा.गल्ली नं.12, जयसिंगपूर), कर्जदार कै.महादेव भाऊ तराळ (रा.हेरवाड, ता.शिरोळ), मॅनेजर राजू गणपत कोळी (रा.चिपरी, ता.शिरोळ), शाखाधिकारी इंद्रजित महादेव जाधव (रा.उदगाव, ता.शिरोळ) यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, लेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी श्री दत्त शासकीय सेवकांची पतसंस्थेचे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2023 या कालावधीचे फेर लेखापरीक्षण 20 मे 2025 रोजी पूर्ण केले आहे. यामध्ये चेअरमन, संचालक, मॅनेजर, शाखाधिकारी व कर्जदार यांच्यासह 10 जणांनी 3 नोव्हेंबर 2014 ते 21 मार्च 2025 अखेर संस्थेचा निधी यातील कर्जदार यांना नियमबाह्य पद्धतीने वाटप करून कर्जदार यांनी उचल केली व नियमबाह्य गुंतवणुक करून रोख शिल्लक रक्क्मेच्या स्वहितासाठी वापर करून वरील 10 जणांनी संगनमताने पतसंस्थेतील 7 कोटी 56 लाख 56 हजार 117 रुपये निधीचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करीत आहेत.