17 लाख रुपये घेवून 25 कोटी रुपये देतो असे सांगून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकांची फसवणूक*

17 लाख रुपये घेवून 25 कोटी रुपये देतो असे सांगून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकांची फसवणूक*
जयसिंगपूर : एन वाय नवा भारत
17 लाख रुपये घेवून 25 कोटी रुपये देतो असे सांगून माझी फसवणूक झाली असून मुंबई, अकलूज, बार्शी व इचलकरंजी येथील चौघांवर गुन्हा दाखल करावा, असा तक्रार अर्ज निवृत्त पोलीस उपनिरीक्षक तानाजी गुरव यांनी जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे दिला आहे.
या तक्रारीत असे म्हंटले आहे की, भारतातील सोने अमेरिकेमध्ये ठेवले आहे. त्याचे मिळणारे व्याज व्यवसायाकरिता आपल्याला मिळणार आहे. त्यामध्ये ठेव म्हणून रक्कम गुंतवल्यास 1 लाखाला 1 कोटी रुपये मिळणार आहेत, असे सांगून माझा विश्वास संपादन केला. वेळोवेळी धनादेशाद्वारे सतरा लाख रुपयाची गुंतवणूक केली. एक वर्ष मुदत पूर्ण झाल्यानंतर पैशाची मागणी केली असता ते देण्यास टाळाटाळ झाली. त्यामुळे संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे अर्जाव्दारे तक्रार केली असल्याची माहिती तानाजी गुरव यांनी पत्रकारांना दिली.