युवामहोत्सवामध्ये देवगडच्या श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाला विभागीय स्तरावर सर्वसाधारण विजेतेपद

युवामहोत्सवामध्ये देवगडच्या श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाला विभागीय स्तरावर सर्वसाधारण विजेतेपद
देवगड: एन वाय नवा भारत डिजिटल नेटवर्क
मुंबई विद्यापीठाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या विभागीय युवामहोत्सवामध्ये देवगडच्या श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १४ कलाप्रकारांमध्ये यश संपादन करून विभागीय स्तरावर सर्वसाधारण विजेतेपद चषकावर महाविद्यालयाचे नाव कोरले आहे.
या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३५ स्पर्धक सहभागी महाविद्यालयामधून जास्तीत जास्त कलाप्रकारांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
दिनांक ४ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी, दिल्ली अँडीशनल सेक्रेटरी डॉ. ममता राणी अग्रवाल आणि प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे आणि सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक सहसमन्वयक डॉ. नितीन वळंजू यांनी महाविद्यालयाच्यावतीने सन्मानचिन्ह स्वीकारले.
तसेच ५७ व्या युवमहोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल डॉ. नितीन वळंजू यांना सन्मानित करण्यात आले.
महाविद्यालयाचा विद्यार्थी सुधांशू सोमण याला मुंबई विद्यापीठाचा “ गोल्डन बॉय ” हा किताब मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिक्षण विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी ५७ व्या युवामहोत्सवातील सर्व सहभागी विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले आहे.