जैन साहित्य व इतिहास परिषदेच्या सदस्यपदी श्रीमती माणिक नागावे

जैन साहित्य व इतिहास परिषदेच्या
सदस्यपदी श्रीमती माणिक नागावे
जयसिंगपूर: एन वाय नवा भारत डिजिटल नेटवर्क
दक्षिण भारत जैन सभेची शाखा असणाऱ्या जैन साहित्य व इतिहास परिषेदेच्या सदस्यपदी जयसिंगपूर येथील लेखिका आणि साहित्यिका श्रीमती माणिक नागावे यांची निवड करण्यात आली.
कर्नाटकातील हारुगेरी येथे पार पडलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या त्रैवार्षिक अधिवेशनात त्यांची निवड निश्चित केली होती. यासाठी त्यांना दक्षिण भारत जनसभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, चेअरमन संजय शेटे, व्हाईस चेअरमन अभिनंदन पाटील, मुख्यमहामंत्री अनिल बागणे, खजिनदार बाळासाहेब पाटील, संघटन मंत्री शशिकांत राजोबा यांचे सहकार्य लाभले.
श्रीमती नागावे सध्या शेडशाळ (ता. शिरोळ) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. आजवर त्यांनी सहा पुस्तके लिहिली असून काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. सातत्यपूर्ण शैक्षणिक, सामाजिक लेखनाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीच्या सदस्या म्हणूनही त्या कार्यरत असून घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमाच्या त्या माजी सल्लागार समितीच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिले आहे.
जैन समाजाच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास करून समाजाची मूलतत्त्वांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे श्रीमती नागावे यांनी सांगितले.