नांदणी सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी बाळकृष्ण देशपांडे यांची बिनविरोध निवड.

नांदणी सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी बाळकृष्ण देशपांडे यांची बिनविरोध निवड.
जयसिंगपूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
नांदणी (ता. शिरोळ) येथील नांदणी सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी बाळकृष्ण देशपांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोल्हापूरचे युसुफ शेख यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. मावळते उपाध्यक्ष राजेंद्र खुळ यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी श्री देशपांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सिनिअर ऑफिसर रुस्तुम मुजावर यांनी स्वागत केले. उपाध्यक्षपदी श्री देशपांडे यांचे नाव राजेंद्र खुळ यांनी सुचविले. त्यास रमेश भुजुगडे यांनी अनुमोदन दिले. बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब लठ्ठे यांनी श्री शेख आणि नूतन उपाध्यक्ष श्री देशपांडे यांचा सत्कार केला. श्री देशपांडे यांनी सर्वांना बरोबर घेऊन बँकेच्या प्रगतीसाठी मी प्रयत्न करेन. लवकरात लवकर बँक पाचशे कोटी रुपयाचा टप्पा बँक पार करेल असे आश्वासन दिले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र कसलकर यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संचालक राजेंद्र खुळ, रमेश भुजगूडे, संजय वसवाडे, बापूसो नदाफ, शितल देमापुरे, सचिन लठ्ठे, महेश परीट, चंद्रकांत कोरुचे, सूर्यकांत कुरडे, संतोष कलगुटगी, संतोष पाटील, संचालिका श्रीमती साधना कोळी, सौ त्रिशला धुळासावंत, बँकेचे ए.जी.एम सुलतान अपराध, बोर्ड सेक्रेटरी भरत चौगुले व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते


