पन्हाळा तालुक्यात गटातटाच होणार लढती..!स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक : पावसाळ्यात तालुक्याते वातावरण लागले तापु.:स्व.आ.यशवंत एकनाथ पाटील गटाच्या अस्तित्व टिकणार काय ❓

पन्हाळा तालुक्यात गटातटाच होणार लढती..!स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक :
पावसाळ्यात तालुक्याते वातावरण लागले तापु.:स्व.आ.यशवंत एकनाथ पाटील गटाच्या अस्तित्व टिकणार काय ❓
शहादुद्दीन मुजावर,/ पन्हाळा
पन्हाळा तालुक्यात सध्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोराने वाहत आहेे.गावोगावी उमेदवार कोण,कोणाची लढत कोणा बरोबर,कोण वरचढ ठरणार या चर्चांना उधाण आले आहे.त्यामुळे ऐन पावसाळ्यात पन्हाळा तालुक्याचे वातावरण तापु लागले आहे.तालुक्याचे राजकारण हे नेहमीच गटतटाच्या बाजुनेच फिरत आहे.तालुक्यात विनय कोरे यांचा जनसुराज्यशक्ती पक्ष,पश्चिम भागात आ.नरके,पी.एन.पाटील,तर पुर्व भागात माजी आ.सत्यजीत पाटील व बाबासाहेब पाटील आसुर्लेकर,स्व.आमदार यशवंत पाटील यांचे गट सक्रिय आहेत.राज्याच्या राजकारणात महायुती व महाविकास आघाडी अशा सामना होत असला तरी तालुक्यात मात्र याचा फारशा फरक नपडता गटतटातच सामना होण्याची चिन्हे सध्या तरी दिसुन येत आहेत.महायुती व महाविकास म्हणुन निवडणुक झाल्यास महायुतीमध्ये बंडखोरी ची दाट शक्यता आहे. गटातटाची निवडणुक झाल्याल मात्र विनय कोरे यांना मोठे आव्हान उभे राहणार आहे.
पन्हाळा तालुका हा शाहुवाडी आणि करवीर या दोन मतदार संघात विभागाला गेला आहे.तालुक्याचा पूर्व भाग हा शाहुवाडीत तर पश्चिम भाग करवीर मध्ये जोडला आहे.तसे पाहता संपुर्ण पन्हाळा तालुक्यात विनय कोरे यांचे चांगले वर्चस्व असल्याचे मागील निवडणुकीत दिसुन आले आहे.पण तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे जि.प.गटात मात्र कोरे यांचे पारंपारिक विरोधक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी आपली पुतणी प्रियांका पाटील यांना निवडुन आणले.तर पश्चिम भागात देखील कळे जि.प मतदार संघात आमदार नरके गटाचे सर्जेराव पाटील विजय झाले.तर यवलुज जि.प मध्ये के.एस चौगुले यांनी आपल्या पत्नी कल्पना चौगुले यांना मिनीमंत्रालयात एंट्री करुन दिली.त्यामुळे तालुक्यात सहा पैकी तीन जागा या कोरे गटाने राखण्यात यश मिळवले.
पण आता पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेले आहे.नेहमीच स्वर्गीय आमदार यशवंत दादा यांचा बालेकिल्ला राहिलेला सातवे मतदार संघ कोरे यांनी शिवाजी मोरे यांच्याकडुन सर केला.याठिकाणी कोरे यांचे कट्टर विरोधक अमरसिंह पाटील यांचा पराभव झाला.त्यात पन्हाळा-बाबडा विधानसभेनंतर पन्हाळा-शाहुवाडी मतदार संघाची नव्याने रचना झाल्याने आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अमरसिंह पाटील यांच्या उमेदवारीचा कोरे यांना बसलेला फटका व झालेला पराभव यामुळे २०१९ मध्ये आपण दोघे ही विधानसभेला उभारलो तर मतविभागाणीचा फटका दोघांनाही बसणार यामुळे अमरसिंह पाटील आणि विनय कोरे यांनी हातमिळवणी करत अनेक वर्षाचा राजकीय संघर्ष संपवला.त्यामुळे विनय कोरे आमदार झाले खरे पण त्याचा पैरा त्यांनी अमरसिंह पाटील यांना गोकुळ मध्ये संचालक पद मिळवुन देत फेडला.पण असे असले तरी अमरसिंह पाटील यांची भुमिका ही गटातील अनेकांना पटली नसल्याने त्यांनी माजी आमदार सत्यजीत पाटील गटाची वाट धरली.आता हा गट विनय कोरे आणि सत्यजीत पाटील या दोन गटात विभागला आहे.त्यामुळे सातवे जि.प.मतदार संघाची लढत कशी असणार,अमरसिंह पाटील मैत्री कायम ठेवणार की उमेदवार देणार याकडे लक्ष लागले आहे.त्यातच यशवंत दादा यांचे नातु जयंत पाटील यांनी अद्याप आपली भुमिका गुलदस्त्यात ठेवल्याने ते आपला जुना गट निवडणुकीच्या निमित्ताने एँक्टीव करणार काय याची देखील उत्सुकता लागली आहे.असे झाल्यास मात्र कोडोली,सातवे जि.प व यातंर्गत येणाऱ्या गणाच्या निवडणुकीची रंगत वाढणार आहे.
आमदार नरके,बाबासाहेब पाटील आसुर्लेकर व आ.कोरे हे महायुतीचे घटक आहेत.पण करवीर मध्ये विधानसभेला कोरे यांनी आपल्या पक्षाकडुन नरके यांना पाठींबा न देता चक्क संताजी घोरपडे यांना उमेदवारी जाहीर केली.तर शाहुवाडी पन्हाळ्यात देखील बाबासाहेब पाटील यांनी युती धर्म न जुमानता आपले कोरे शी सुरु असलेले वैरत्व कायम ठेवत आघाडीचे सत्यजीत पाटील यांना रसद पोहचवली.त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील या पारंपारिक गटांच्यातच लढती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तर तालुक्यात पश्चिम भागात पी.एन.पाटील गट काग्रेस म्हणुन निवडणुकीला सामोरे जाईल.पण पुर्व भागात काँग्रेसचे अमरसिंह पाटीलच कोरे यांच्या गळाला लागले आहेत.तर शिवसेना उबाठा चे माजी आमदार सत्यजीत पाटील यांची बाबासाहेब पाटील यांच्याबरोबर असणाऱे सख्य यामुळे महाविकास आघाडीकडुन उमेदवार मिळणे अशक्य आहे.त्यामुळे सत्यजीत पाटील व अमरसिंह पाटील आपल्या उपकारांची परतफेड करण्याचे ठरविल्यास पक्षीय पेक्षा गटातटाच्या राजकाणालाच उकळी फुटणार आहे.हे मात्र निश्चित.