आपला जिल्हाताज्या घडामोडी
शिष्यवृत्तीप्राप्त देवयानी पाटील हिचा सत्कार

शिष्यवृत्तीप्राप्त देवयानी पाटील हिचा सत्कार
शिरोळ: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शिरोळची सुकन्या व जयसिंगपूरच्या जनतारा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी देवयानी संजय पाटील हिने नुकत्याच झालेल्या NMMS व सारथी परिक्षेमध्ये शिष्यवृती प्राप्त केलेबद्दल कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जयसिंगपूर येथील जनतारा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंत व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते व शिरोळचे तहसिलदार अनिलकुमार हेळकर, जनतारा शिक्षण संकुलाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देवयानी पाटील हीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक वाडकर, संजय पाटील, सौ वर्षा पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.