आपला जिल्हाताज्या घडामोडी
शिरटी येथील विकास कामांसाठी निधी देण्याची पालकमंत्री अबिकटकर यांच्याकडे मागणी
- शिरटी येथील विकास कामांसाठी निधी देण्याची पालकमंत्री अबिकटकर यांच्याकडे मागणी
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शिरटी ता. शिरोळ येथील विविध विकासकामांसाठी निधी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची गारगोटी येथील संपर्क कार्यालयात भेट घेऊन निधी मागणीबाबतचे निवेदन दिले
गोरगरिब, सर्वसामान्य मुलांच्या भवितव्यासाठी महत्वाचा आधार असलेल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा भौतिकदृष्ट्या संपन्न होऊन त्या टिकून राहाव्यात याकरिता शाळा दुरुस्तीसह विविध कामे, तसेच गावातील पाणंद रस्ते, मागासवर्गीय वस्तीमधील विकासकामे यासह विविध कामासाठी निधी द्यावा याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी आबिटकर यांनी शिरटी गावासाठी जास्तीत – जास्त निधी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.यावेळी माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी, उपसरपंच प्रकाश माळी, सामाजिक कार्यकर्ते सतीश चौगुले, आरपीआयचे शिरोळ तालुकाध्यक्ष संजय शिंदे, राजकुमार शिरगावे, आलम मुल्लानी, कॉन्ट्रॅक्टर अमित शिरगावे उपस्थित होते.