आपला जिल्हाताज्या घडामोडी

प्राचार्य महेश पाटील यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रीय प्राचार्य पुरस्कार: एज्युटेक एक्स्पो हैदराबाद संस्थेतर्फे गौरव

प्राचार्य महेश पाटील यांना
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रीय प्राचार्य पुरस्कार


एज्युटेक एक्स्पो हैदराबाद संस्थेतर्फे गौरव

पन्हाळा: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
येथील संजीवन ज्ञानसंकुलातील संजीवन विद्यालय पन्हाळा या निवासी प्रशालेचे प्राचार्य महेश पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यातील योगदानाचा गौरव करण्यासाठी एज्युटेक एक्स्पो २०२५ या प्रतिष्ठित संस्थेचा “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रीय प्राचार्य पुरस्कार” हैदराबाद येथे दिमाखदार सोहळ्यात नामांकित शिक्षण तज्ज्ञांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन देणे आणि शिक्षकांचा समाजामध्ये असलेला महत्त्वाचा दर्जा अधोरेखित करण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात.
यापुर्वीही त्यांना मुंबई येथील नामांकित संस्थेचा नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड व इतरही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

असा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त करून प्रशालेच्या व संजीवन परिवाराच्या गुणगौरवात भर घातल्याबद्दल आदरणीय महेश पाटील सर यांचे संस्थेचे अध्यक्ष पी.आर.भोसले सहसचिव एन. आर.भोसले,क्रीडा संचालक सौरभ भोसले,शाळा व्यवस्थापन सदस्य सर्व प्रशालांचे प्राचार्य,समन्वयक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केलेले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??