ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार यांना नामदेव भोसले स्मृती पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार यांना नामदेव भोसले स्मृती पुरस्कार जाहीर
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक सुनील इनामदार यांना यावर्षीचा नामदेव भोसले स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्रिवेणी, बळी अशा विविध कादंबर्या यांचे लेखन त्यांनी केले असून व शताकारंभ,नवोन्मेष अशा प्रातिनिधिक कथा व कविता संग्रह तसेच साहित्य सहयोग दीपावली अंकाच्या माध्यमातून अनेक नवसाहित्यिकांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. त्यांच्या या साहित्यसेवेची दाखल घेवून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
1, मार्च 2026 रोजी मिरज येथे होणाऱ्या नामदेव चैतन्य साहित्य संमेलनात हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मोहन पाटील यांच्या हस्ते व सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील डॉ. रियाज मुजावर डॉ. विनोद परमशेट्टी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे



