
स्व. आम. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर आसावरी इंगळे आणि दीपक कुंभार यांच्या कथांना प्रथम क्रमांक विभागून
शिरोळ एन.वाय.नवा.भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
स्व. आम. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेमध्ये आसावरी इंगळे (जामनगर, गुजरात) लिखित ‘ते 36 तास’ आणि दीपक कुंभार (कोल्हापूर) लिखित ‘तो बाप होता म्हणून’ या कथांना प्रथम क्रमांक विभागून मिळाला. या कथा स्पर्धेचे हे दहावे वर्ष असून या कथा स्पर्धेला साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांच्या बरोबरच परदेशातूनही यावेळी एकूण 99 कथा प्राप्त झाल्या होत्या. यामधून 15 कथांना विविध बक्षिसे जाहीर करण्यात आली असल्याची माहिती साहित्य सहयोग दीपावली अंकाचे संपादक सुनील इनामदार व मासिक इंद्रधनुष्यचे कार्यकारी संपादक संजय सुतार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
इतर बक्षिसे खालील प्रमाणे आहेत:-
द्वितीय क्रमांक विभागून : ए फ्रेंड इंडीड – अशोक गोवंडे (इचलकरंजी), रक्तापलीकडचं नातं – सौ. सरस्वती येडसे (कोथळी, शिरोळ). तृतीय क्रमांक विभागून – गोष्ट चार आण्याची – कलाप्पा पाटील (कालकुंद्री, चंदगड), भाऊबीज – ओंकार कुचेकर (सहकारनगर, पुणे). विशेष उल्लेखनीय कथा – जातं – शंकर मारुती पाटील (पेठ, वाळवा), पालातला जन्म – सौ. वंदना जाधव भोसले (बहिरेवाडी, पन्हाळा), बदलते रंग अंतर्मनाचे – डॉ. राजश्री शिरभाते (सध्या इंग्लंड). उत्तेजनार्थ कथा – उपरी – डॉ. मोनाली हर्षे (पुणे), देविका – सौ. अस्मिता मेहता (कात्रज), शूरा मी वंदिले – डॉ. राजेश जोशी (सातारा). उत्तेजनार्थ स्थानिक – कुडतं – अशोक बाळू पाटील (तिसंगी, गगनबावडा), यात दोष कोणाचा – डॉ. स्वाती पाटील (सांगली), पारिजातक – सौ. वसुंधरा निकम (सातारा).
विजेत्या कथांना साहित्य सहयोग दीपावली अंकात प्रसिद्धी दिली जाणार आहे. बक्षीस वितरण समारंभ स्व. आम. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या जयंती दिनी दि. 11 डिसेंबर 2025 रोजी होणार असल्याची माहितीही सुनील इनामदार व संजय सुतार यांनी दिली.