ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अ‍ॅड.अमित जामसंडेकर यांनी घेतली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ. थेट न्यायमूर्ती म्हणून निवड झालेले जिल्ह्यातील पहिलेच वकील

अ‍ॅड.अमित जामसंडेकर यांनी घेतली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ.

थेट न्यायमूर्ती म्हणून निवड झालेले जिल्ह्यातील पहिलेच वकील

देवगड:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र अ‍ॅड. अमित जामसंडेकर
यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताचे राष्ट्रपतींनी, भारताच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून विधिज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना आज मुंबई उच्च न्यायालयात संपन्न झालेल्या शासकीय सोहळ्यात पदाची शपथ देण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठाचे न्यायमूर्ती दूरदृश्य प्रणालीद्वारे या समारंभाला उपस्थित होते.
अ‍ॅड. अमित हे बौद्धिक संपदा अधिकार या विषयात मोजक्या असलेल्या तज्ज्ञ वकिलांपैकी एक आहेत. 26 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत त्यांनी ट्रेडमार्क,पेटंट, कॉपीराइट,
गोपनीय माहिती, भौगोलिक संकेत, लवाद आणि इतर व्यावसायिक कायद्यांचा समावेश असलेले खटले भारतात दाखल केले आहेत.
वकील म्हणून काम करताना थेट न्यायमूर्ती म्हणून निवड झालेले हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलेच वकील आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??