मुंबई येथील सी.बी.एस.ई. क्लस्टर व्हॉलीबॉल स्पर्धैत संजीवन पब्लिक स्कूल उपविजेते.

मुंबई येथील सी.बी.एस.ई. क्लस्टर व्हॉलीबॉल स्पर्धैत संजीवन पब्लिक स्कूल उपविजेते.
पन्हाळा- शाहदुद्दीन मुजावर
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
नुकत्याच मुंबई येथे संपन्न झालेल्या सी.बी.एस.ई महाराष्ट्र क्लस्टर व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात संजीवन पब्लिक स्कूलने उपविजेतेपद पटकावले.या संपूर्ण स्पर्धेत संजीवनच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी केली.
एम.व्ही.एम.इंटरनॅशनल स्कूल,अंधेरी यांच्यावतीने आयोजित या व्हॉलीबॉल स्पर्धेत संजीवनच्या संघाने सुरवातीपासूनच दबदबा निर्माण केला होता.साखळी सामन्यात सर्व सामने जिंकत बाद फेरीत मालेगाव(नाशिक) या संघासोबत झालेल्या रोमहर्षक लढतीत २-१ अशा सेटनी संजीवनच्या संघाने विजय मिळवला. तर उपांत्यपूर्व सामन्यात संजीवनच्या संघाने प्रतिस्पर्धी संघावर २-० अशा सेटनी एकतर्फी विजय मिळवत उपांत्य सामन्यात धडक दिली. उपांत्य सामन्यातदेखील सोलापूर संघासोबत झालेल्या सामन्यात २-० अशा सेटनी सहज विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
अंतिम सामन्यातही संजीवनच्या संघाने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले.
अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात २-१ अशा सेटनी न्यू होरायझन स्कूलने विजेतेपद पटकावले.
त्यामुळे संजीवन पब्लिक स्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
संजीवनचा खेळाडू श्लोक कवतिके याला स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले
या संघाला क्रीडा शिक्षक प्रकाश जाधोर, प्रशिक्षक अबिद मोकाशी,कपिल खोत,नुरमहंमद नगारजी,जयंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन तर संजीवनचे क्रीडा संचालक सौरभ भोसले,संस्थापक पी.आर.भोसले, सहसचिव
एन.आर.भोसले,प्राचार्य बी.आर. बेलेकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांचे प्रोत्साहन लाभले.