हर्षदा पाटीलची क्रीडा कोट्यामधून सीआयएसएफमध्ये हेडकॉन्स्टेबलपदी निवड

हर्षदा पाटीलची क्रीडा कोट्यामधून सीआयएसएफमध्ये हेडकॉन्स्टेबलपदी निवड
सैनिक टाकळी :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
सैनिक टाकळीची सुकन्या कु. हर्षदा हणमंत पाटील हिची क्रीडा कोट्यामधून सीआयएसएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल पदी निवड झाली आहे.
हर्षदाला बालपणापासूनच खेळाची आवड व खेळामध्ये करिअर करून दाखवण्याची जिद्द होती. तिचे प्राथमिक शिक्षण कन्या विद्या मंदिर सैनिक टाकळी येथे पूर्ण झाल्यानंतर खेळातील कौशल्य ओळखून तिच्या पालकांनी राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन, क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे प्रवेश घेतला होता .
तिथे तिला खो-खो खेळामध्ये प्रोत्साहन मिळाले आणि तिने महाराष्ट्राच्या 14 वर्षीय खो-खो संघाचे नेतृत्व केले. अकरावीनंतरचे शिक्षण स्वामी विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर येथे सुरू झाले तिथेही तिला खेळात प्रोत्साहन मिळत गेले.
तिने 14 वर्षाखालील खो खो संघाचे नेतृत्व करून आपल्या संघाला राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिके मिळवून दिली. तिला महाराष्ट्र व केंद्र सरकारकडून बहुमान मिळालेले आहेत.
तिचे खेळातील प्राविण्य पाहून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी हर्षदाची आपल्या क्रीडा संघामध्ये निवड केली.
तिच्या यशात तिचे आई-वडील, प्रशिक्षक व मार्गदर्शक, शिक्षक यांचे मोलाचे योगदान आहे. तिच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल तिचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.