आवडीचे क्षेत्र निवडल्यास यश निश्चित : सिने अभिनेत्री शितल पाटील

आवडीचे क्षेत्र निवडल्यास यश निश्चित : सिने अभिनेत्री शितल पाटील
सैनिक टाकळी:वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
आपल्या अंगातील लपलेली कौशल्ये वेळेत ओळखल्यास कोणत्याही क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करता येते यासाठी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात करणे आवश्यक असते असे प्रतिपादन शाळेची माजी विद्यार्थिनी सिनेअभिनेत्री शितल पाटील यांनी केले .त्या छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील होते. त्या पुढे म्हणाल्या यश मिळविण्यासाठी आत्म-शोध महत्त्वाचा असतो.कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी वेळेत एखाद्याच्या अंगभूत प्रतिभेची ओळख पटवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधी व त्यांच्या ताकदीचा शोध घेण्यास आणि विकसित करण्यास प्रेरित करणे आवश्यक असल्याचे तिने सांगितले.यावेळी मुख्याध्यापक विनोद पाटील,जेष्ठ शिक्षक उदय पाटील,एम.एम.धुमाळे, महेश कडाळी यांनी मनोगते व्यक्त केली.दरम्यान विद्यार्थ्यांच्या कडून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.सिने क्षेत्रात यश संपादन केले बद्दल शाळेच्यावतीने शितल पाटील हिचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक आर .एस. खोपडे यांनी तर आभार आर.एम.पाटील यांनी मानले सूत्रसंचलन सई भोसले हिने केले.कार्यक्रमास शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.