जयसिंगपूरच्या माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संस्थेस 50 लाख 75 हजार रुपयांचा नफा -अजितकुमार खवाटे

जयसिंगपूरच्या माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत
संस्थेस 50 लाख 75 हजार रुपयांचा नफा -अजितकुमार खवाटे
एन वाय नवा भारत डिजिटल नेटवर्क
येथील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर या पतसंस्थेस अहवाल सालात 50 लाख 75 हजार इतका नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अजितकुमार खवाटे यांनी दिली .ते संस्थेच्या 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते .
प्रारंभी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .ते पुढे म्हणाले संस्थेने आज अखेर 22 कोटी 9 लाख इतके ठेवीचे उद्देश पूर्ण केले आहे .संस्थेस ऑडिट वर्ग अ मिळाला असून 14 टक्के प्रमाणे लाभांश देण्यात येणार आहे .संस्थेने आरटीजीएस एनईएफटी सुविधा उपलब्ध करून दिली आहे .
यावेळी सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला तसेच मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यातील विजेत्या शाळाचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .त्याचबरोबर सहाय्यक निबंधक कार्यालयाचे प्रमोद मेश्राम,महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष खंडेराव जगदाळे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला .
स्वागत सौ .सीमा दळवी यांनी तर अहवाल वाचन मॅनेजर एस .डी . जैन यांनी केले तर सभासदांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान तज्ञ संचालक जी . एन . पाटील यांनी केले .
यावेळी व्हाईस चेअरमन गुणधर मगदूम संचालक प्रमोद कवठेकर, राजेंद्र कोळी, शामगोंडा पाटील, श्रेया वांजुळे, सौ सीमा दळवी, जगन्नाथ कांबळे, प्रकाश कळंत्रे, विजयकुमार मद्धाण्णा, सच्चिदानंद जंगम, विठ्ठल पाटील, शितलकुमार कोले, रावसाहेब पाटील, मोहन पांडव, आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .