आपला जिल्हाताज्या घडामोडी

जयश्री पाटील जिल्हास्तरीय ‘ज्ञानज्योती ‘ पुरस्काराने सन्मानित           

जयश्री पाटील जिल्हास्तरीय ‘ज्ञानज्योती ‘ पुरस्काराने सन्मानित   

                                           

जयसिंगपूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयातील अध्यापिका जयश्री जगदीश पाटील यांना बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशन व आम्ही उद्योजिका या महिला उद्योजक वतीने जिल्हास्तरीय ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त उपक्रमशील शिक्षिका सन्मान सोहळा रोटरी क्लब ऑफ सांगली येथे संपन्न झाला. शैक्षणिक- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जिल्हास्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार मा. डॉ. भारती पाटील (समन्वयक, शारदाबाई पवार अध्यासन केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला .जयश्री पाटील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात २० वर्षे ज्ञानदानाचे कार्य करीत असून, राधा महिला सोशल फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा आहेत. राजर्षी शाहूनगर वाचनालय शिरोळ च्या संचालिका आहेत. एकपात्री अभिनय , काव्यवाचन, काव्य लेखन ,विविध वृत्तपत्रातून समाज प्रबोधन लेखन, प्रबोधन पर व्याख्यान इ. मध्ये सहभागी असून, त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 सन्मान सोहळ्यास डॉ.पूजाताई नरवाडकर,(प्राचार्य न्यू लॉ कॉलेज सांगली) जे.के (बापू)जाधव (मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रयत शिक्षण सातारा) सुनील महाजन (आनंदी शिक्षण आहिल्या नगर )आदी मान्यवर उपस्थित होते .यासाठी विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील ,सचिव प्रा. मेजर के. एम. भोसले, उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे, खजिनदार कृष्णात पाटील, सर्व संचालक मुख्याध्यापक, शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले

 

 

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??