आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगर या संस्थेचा 28 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग , या संस्थेचा 28 वा वर्धापन दिन विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन साजरा करण्यात आला. 

 

प्रमुख पाहुणे जतचे माजी आमदार विक्रम सिंह सावंत होते तर प्रमुख वक्त्या मनीषा डांगे होत्यासंस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यात – श्रीफत्तेसिंह मोरे (कृषीरत्न पुरस्कार) , श्री. विलास मर्दाने (समाजभूषण पुरस्कार) , श्री. संदिप आडके (युवा उद्योजक पुरस्कार) , श्री. सादिक गवंडी (उद्योगभूषण पुरस्कार) या सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

तसेच मार्च 2025 – एसएससी बोर्ड परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या कु. राधिका वरक , कु. श्रावणी झोरे , कु. सानिका पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .

श्री. अकबर मुल्ला – निवृत्त प्राचार्य श्री पद्माराजे विद्यालय शिरोळ , श्री. भगवानराव कांबळे. ( समाजभूषण पुरस्कार प्राप्त ) , श्री. अमोल चव्हाण (आदर्श सरपंच पुरस्कार ) ,श्री. परशराम चव्हाण (निवृत प्राथमिक शिक्षक ) , श्रीमती वंदना कदम (मुख्याध्यापिका ) विद्या मंदिर धाकटे आगर कु. प्रज्ञा माळकर ( युवा वक्त्या ) , श्री. अकबर चिकोडे – साई ग्राफिक्स मौजे आगर , सौ. जयश्री पाटील जिल्हास्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार प्राप्त , कु. शौर्य पाटील (जिल्हास्तरीय तलवारबाजी खेळाडू ) सौ. नीता कांबळे (सेवा निवृत ) संस्थेचे संचालक श्री. अमित जाधव या सर्वांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले

प्रमुख पाहुणे श्री. विक्रमसिंह सावंत यांनी आपल्या मनोगतातून शिक्षण क्षेत्रात झालेले बदल व शिक्षण क्षेत्रावर झालेले परिणाम त्याचे फायदे व तोटे , पूर्वीची शिक्षण पद्धती आणि आताची शिक्षण पद्धती यामध्ये खूप फरक पडलेला आहे. असे सांगितले तसेच धनाजीराव जगदाळे यांनीही मौलिक मार्गदर्शन केले

प्रमुख वक्त्या सौ. मनिषा डांगे यांनी मुलांवर चांगले संस्कार करा , मुलांना स्वावलंबी बनू द्या , त्याला माणूस बनू द्या , पुस्तके वाचून सुद्धा आयुष्यातले टर्निंग पॉईंट येवू शकतात. पुस्तके जगायला प्रेरणादायक ठरू शकतात असे प्रतिपादन केले .

अध्यक्षीय मनोगतातून डॉ. जगदीश पाटील यांनी शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही , सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे , संस्थेची होत चाललेली प्रगती , तसेच विविध भौतिक सुविधांविषयी माहिती दिली . स्वागत मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांनी केले प्रास्ताविक सचिव प्रा. मेजर के एम भोसले यांनी केले सूत्रसंचालन श्री नितीन बागुल यांनी केले आभार सौ. जयश्री पाटील यांनी मानले प्रमुख पाहुण्यांचा हस्ते संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला

यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते . तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??