अच्छे दिन येणार !! गाड्यांच्या किंमती स्वस्त होणार

अच्छे दिन येणार
गाड्यांच्या किंमती स्वस्त होणार !!
भारतीय वाहन उद्योगाला सणासुदीत मिळणार
जी.एस.टी. कपातीमुळे बुस्टर..
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणाऱ्या नवीन जी.एस.टी. धोरणांमुळे भारतीय कार बाजारात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. या नवीन जी.एस.टी. नियमांनुसार अनेक कार कंपन्यांच्या मॉडेल्सच्या किमतींमध्ये सवलत करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांना कार खरेदी करताना मोठी बचत होणार आहे.महिंद्रा कंपनीने त्यांच्या लोकप्रिय वाहतुकीत बोलेरो निओ, XUV 3XO (पेट्रोल आणि डिझेल), थार, स्कॉर्पिओ आणि XUV700 या मॉडेल्सच्या किमतीत ₹1,00,000 ते ₹1,56,000 पर्यंत कपात केली आहे.
या सवलतीमुळे महिंद्राच्या ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे.टाटा मोटर्सने देखील टियागो, टिगोर, अल्ट्रोज, पंच, नेक्सॉन, हॅरियर आणि सफारीसारख्या मॉडेल्सवर ₹75,000 ते ₹1,55,000 पर्यंत सवलत दिली आहे. यामुळे मध्यवर्गीय व मध्यम वर्गीय ग्राहकांना त्यांच्या आवडत्या टाटा कार मॉडेल्सवर नवी GST सवलत लाभणार आहे.
किआ मोटर्सने सोनॅट, सायरोस, सेल्टॉस आणि कारन्स या मॉडेल्सवर ₹48,000 ते ₹1,86,000 पर्यंत कपात जाहीर केली आहे, तर टोयोटाने फॉर्च्युनर, लेजेन्डर व हिलक्ससारख्या मॉडेल्सवर प्रचंड सवलत दिली असून त्यांची किंमत ₹2,50,000 ते ₹3,50,000 पर्यंत कमी झाली आहे.ह्युंदै कंपनीच्या टुसॉन, ग्रँड i10 निओससारख्या मॉडेल्सवर ₹70,000 ते ₹2,40,000 पर्यंत सवलत असून ग्राहकांना SUV आणि हॅचबॅक कार्सवर फायदा मिळणार आहे.
मारुती सुजुकीच्या अल्टो K10, वॅगनआर, स्विफ्ट, डझायर, बलेनो आणि फ्रॉन्क्स या कार्सवर ₹40,000 ते ₹68,000 पर्यंत GST नवीन दरानुसार सवलत देण्यात आली आहे.लक्झरी कार बाजारात देखील नवीन जी.एस.टी. दर भारतातील अनेक लक्झरी ब्रँड्ससाठी फायद्याचे आहेत.
मर्सिडीज-बेंजने विविध लक्झरी मॉडेल्सवर ₹25,00,000 पर्यंत, BMW ने ₹8,90,000 पर्यंत, तर ऑडीने ₹2,60,000 ते ₹7,80,000 पर्यंत जी.एस.टी. सवलत जाहीर केली आहे.
तसेच दुचाकींच्या किंमतीतही या सवलतीमुळे घट होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच दुचाकी – चार चाकी अशी गाडी सणासुदीच्या काळात विकत घेणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी असून वाहन उत्पादकांनाही गेल्या काही दिवसापासून मंदीचा सामना करावा लागला होता. आता वाहन उत्पादकांनाही येत्या सणासुदीत मोठी कामगिरी करून घेण्याची संधी मिळालेली आहे ग्राहक याला चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आघाडीच्या वाहन उत्पादकांनी आणि वाहन उद्योग तज्ञांनीही व्यक्त केलेली आहे
या सवलतींमुळे ग्राहकांचा खर्च कमी होऊन कार खरेदी अधिक परवडणारी आणि सोपी होणार आहे. नवीन जी.एस.टी. धोरणांमुळे भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाला बळ मिळण्याची अपेक्षा आहे. ग्राहक आपल्या आवडत्या कार/ बाइक मॉडेल्सच्या नवीन किमतींवर लक्ष ठेवून आहेत.
हे बदल स्पर्धात्मक बाजारपेठ तयार करण्यात मदत करतील आणि ग्राहकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील. जी.एस.टी. मध्ये झालेल्या या बदलांमुळे भारतीय वाहन उद्योगाला सणासुदीत चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.


