आपला जिल्हाताज्या घडामोडी

स्वस्थ नारी सशक्त परिवार* अभियानांतर्गत गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाचे उपक्रम*

स्वस्थ नारी सशक्त परिवार* अभियानांतर्गत गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाचे उपक्रम*

गारगोटी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
*स्वस्थ नारी सशक्त परिवार* या अभियाना अंतर्गत आज ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे सर्वरोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्या शिबिरामध्ये गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी ६०रुग्णांवर आयुर्वेदिक औषधोपचार केले. तसेच मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना समुपदेशन केले. योग व निसर्गोपचार याविषयी माहिती दिली.


सदर शिबिरावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर सर, ग्रामीण रुग्णालय राधानगरीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. बी. गायकवाड मॅडम, ग्रामीण रुग्णालय राधानगरीचे सर्व वैद्यकीय अधिकारी,अनेक तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.


या कार्यक्रमासाठी गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर मॅडम,वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कदम सर व incharge राऊत सिस्टर यांचे सहकार्य लाभले.


*स्वस्थ नारी सशक्त परिवार* *या अभियानांतर्गत  डॉ. स्नेहल कुलकर्णी यांचे व्याख्यान*


*स्वस्थ नारी सशक्त नारी* या अभियानांतर्गत गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या नोडल ऑफिसर डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी आज 17 /9/ 2025 रोजी राधानगरी विद्यालय व उच्च माध्यमिक विदयालय येथे २५० मुला मुलींना निरोगी जीवनशैली व पोषण तसेच किशोरवयीन समस्या या विषयावर व्याख्यान दिले. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याला समाधानकारक उत्तरे दिली. मासिक पाळीच्या वेळी घ्यावयाची काळजी व स्वच्छता याबद्दलही मुलींना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. बी. गायकवाड मॅडम व गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. पल्लवी तारळकर मॅडम यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??