आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री करवीर निवासिनी आई अंबाबाई आईसाहेबांची “श्री षोडशी त्रिपुरसुंदरी” स्वरूपात सालंकृत पूजा

श्री करवीर निवासिनी आई अंबाबाई आईसाहेबांची “श्री षोडशी त्रिपुरसुंदरी” स्वरूपात सालंकृत पूजा.

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

|| श्रीमाता ||

अश्विन शु., दिनांक २८ सप्टेंबर २०२५

पूजा क्रमांक. ६ / महाविद्या क्र. ३

|| श्रीषोडशी त्रिपुरसुंदरी ||

ध्यानम – बालार्क मंडलाभासां चतुर्बाहुं त्रिलोचनाम् |

पाशांकुश-शरांश्चापं धारयंती शिवां भजे ||

स्वरूप – उगवत्या सूर्याप्रमाणे जिचा वर्ण असून, जिने आपल्या हाताप्रमाणे पाश-अंकुश-पंचबाण व उसाचा धनुष्य धारण केला आहे, अशा श्रीमाता त्रिपुरसुंदरीची मी उपासना करतो.

 

इतिहास –

पूर्वी भंडासुरांच्या अत्याचाराला त्रासलेल्या व स्वर्गादि स्वस्थानापासून वंचित झालेल्या देवतांनी, महर्षी नारदांच्या उपदेशानुसार श्रीमहात्रिपुर सुंदरी देवीची घोर तपश्चर्या आरंभली, यामध्ये देवीस उद्देशुन देवगण ‘महायाग’ करू लागले, यावेळी प्रसन्न होऊन देवी माघी पोर्णिमेस अग्निकुंडातून प्रगट झाली. ही दशमहाविद्येतील तिसरी देवता असून, ‘ललितेश्वर’ हे तिचे भैरव आहेत. ही श्रीकुल प्रमुख असणारी देवता, पूर्वाम्नायपीठस्था आहे.

उपासना भेद -बाला त्रिपुरसुंदरी, महात्रिपुरसुंदरी, श्रीषोडशीललिता, राजराजेश्वरी, त्रिपुरा, सुभगा, कामेश्वर इ. हिचे उपासनाभेद व प्रकार आहेत.
फल -हिच्या उपासनेने सुखभोगलाभ, पीडानिवारण, मुक्तिलाभ, सौभाग्यप्राप्ती, सर्व आध्यात्मिक शक्ती यांचा लाभ होतो, साक्षात् शिव, कुबेर, अग्नि, सूर्य, दुर्वास, दत्त, परशुराम इ. हिचे उपासक भक्त आहेत.
आधार लेखन
वेदमूर्ती सुहास जोशी गुरुजी, कोल्हापूर

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??