कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कारखानदार व कामगार संघटनांनी सकारात्मक विचार करणे गरजेचे :शरद पवार

कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत तर ग्रामीण भाग बेरोजगार होईल : खासदार शरदचंद्र पवार
पन्हाळा: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
साखर धंद्यात कामगार हा महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे कामगारांच्या स्थिरता येणे गरजेचे आहे पूर्वी कारखाना बंद पडला तर तो कारखाना सहकाराच्या माध्यमातून कामगारांसाठी पुन्हा चालू केला जात असे पण सध्या कारखान्यांचे सहकाराऐवजी खासगीकरण चालू आहे त्याने दिवसेंदिवस कामगारांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत त्यामुळे राज्यशासनाने कामगारांचे प्रश्न सोडवले नाही तर ग्रामीण भाग बेरोजगार होईल असे प्रतिपादन माजी कृषिमंत्री व विद्यमान राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पन्हाळा येथील तीन दिवशीय शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले,अशा शिबिरातून कामगार कायदे व साखर धंद्याची सद्यस्थिती जाणून घेतात. म्हणूनच मी खात्रीने सांगतो साखर धंदा,ऊस उत्पादक शेतकरी व कष्ट करणारा कामगार या तिघांच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल. स्वातंत्र्याच्या वेळी ८३ टक्के लोक शेती करत होते व आज तीच संख्या ५२ टक्के वर आली आहे. एकेकाळी आपला देश कृषी व्यवसायाचा देश होता.पण सध्या जमिनीचे क्षेत्र कमी झाले आहे.कारखानदारी मुळे साखर धंदा वाढत आहे.पण त्यातही बदल होत पूर्वी बाराशे ते दोन हजार गाळप क्षमता असलेल्या कारखान्यात कामगार संख्या दोन हजार होती. आज त्याच कारखान्याची गाळप क्षमता वाढली कामगार संख्या तीच आहे. त्यामुळे कष्टकरी कामगाराला दिवसेंदिवस नवीन व्यवसाय शोधावा लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कामगारांचे प्रश्न तयार होऊ लागले आहेत.ते सोडवण्यासाठी राज्य सरकार कारखानदार व कामगार संघटनांनी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.
आज साखर धंदा हा केवळ साखर धंदा राहिला नाही. कारखानदार साखरेबरोबर मोलेसिस पासून इथेनॉल, वीज निर्मिती करतात. त्यामुळे बदलणारे साखरेचे चित्र लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागतो.आज देश देशातील साखर धंद्यात ४०% कामगार कंत्राटी आहेत. सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक पातळीवर कामगार संघटना मजबूत करणे गरजेचे आहे.तर अध्यक्षीय भाषणात यावेळी जयंत पाटील यांनी,महाराष्ट्रात सहकारी पेक्षा खाजगी कारखाने वाढले आहेत.त्यामुळे साखर कामगारांची आव्हाने मोठी झाली आहेत. कामगारां बरोबरच शेतकऱ्यांचे ही प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.सध्या साखर कारखान्यात ४० टक्के कामगार कंत्राटी असल्यामुळे मूळ कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. कामगारांचे संरक्षण करणे आव्हान आहे.कामगारांच्या हितासाठी संघटित व्हा असे आवाहन केले.तर कंत्राटी कामगारांचा कामगारांच्या थकीत पगाराचा गंभीर झालेला प्रश्न मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी तात्यासाहेब काळे यांनी प्रास्ताविकात पवार यांच्याकडे केली. तर पी.आर.पाटील यांनी आपल्या मनोगतात एम एस पी वाढवले नसल्याने एफ आर पी देणे व कामगारांचे पगार वाढवणे अवघड होतंय त्यामुळे शासनाने पूर्वीचा एम एस पी चा दर ३१०० वरून ४१०० रुपये करावा व इथेनॉलच्या दरात प्रति लिटर पाच रुपये इतकी वाढ करण्याची मागणी केली.कार्यक्रमाचे स्वागत मंडळाच्या सरचिटणीस रावसाहेब पाटील यांनी केले तर आभार उपाध्यक्ष रणनवरे यांनी आभार मानले.या वेळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज जाचक व गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


