कारखाने आपले दैवत आहेत याची जाणीव ठेवावी:गणपतराव पाटील

कारखाने आपले दैवत आहेत याची जाणीव ठेवावी:गणपतराव पाटील
पन्हाळा येथे राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळ शिबिराचा दुसरा दिवस
पन्हाळा: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारच्या कामगारांच्या नियमांमुळे कामगार अस्वस्थ असले तरी साखर कारखाने आपले दैवत आहेत याची जाणीव ठेऊन काम करावे आसे प्रतिपादन दत्त शेतकरी सह साखर कारखानाचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी केले ते महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, केंद्र शासनाचे कामगारांच्या नियमांतून कामगारांचे शोषण होत आहे. तसेच, दिवसेंदिवस कामगार संघटनांचा दबदबा कमी होऊ लागला आहे, असे असले तरी वेळोवेळी कामगार प्रतिनिधी मंडळ कामगारांच्या हितासाठी धडपडत आहेत त्यातून योग्य निर्णय लवकरच होवून कामगारांना चांगले दिवस येतील पन्हाळा येथे महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक जयंतराव पाटील, भोगावती कारखान्याचे चेअरमन प्रा.शिवाजीराव पाटील व कामगार कल्याण आयुक्त रवीराज इळवे यांनी कार्यक्रमाचे ठिकाणी भेट देऊन सदिच्छा व्यक्त केल्या
पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेच्या संस्कृती सभागृहात तीन दिवस चालणाऱ्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात अॅड. गणेश शिंदे यांनी बदललेले कामगार कायदे आणी त्यावर कामगारांनी कोणती दक्षता घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले तर गणेश शिंदे यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर विवेचन केले यावेळी सर्व कामगार प्रतिनिधी मंत्रमुग्ध होवुन गेले होते दुसऱ्या दिवसाची सांगता विठ्ठल कोतेकर यांनी समृध्दीच्या मानसिकतेतून सर्वांगीण विकास यावर मार्गदर्शन केले
शनिवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व आमदार चंद्रदीप नरके व चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे साखर कारखाना प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत सांगता होणार असल्याचे कामगार प्रतिनिधी मंडळाचे कोषाध्यक्ष प्रदिप बनगे यांनी सांगितले


