शिरोळमध्ये मंगळवारी दांडिया महोत्सव प्रथमच दांडिया महोत्सवाचे आयोजन.

शिरोळमध्ये मंगळवारी दांडिया महोत्सव-
प्रथमच दांडिया महोत्सवाचे आयोजन.
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
येथील रोटरी क्लब ऑफ शिरोळ आणि डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्यावतीने मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता टारे लॉन्स येथे प्रथमच दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरोळ व परिसरातील महिलांना सांस्कृतिक परंपरा सादर करण्यासाठी नवरात्र उत्सवानिमित्त मंगळवारी रोटरी क्लब ऑफ शिरोळ, राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्यावतीने दांडिया महोत्सव होणार आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या महिलांना आकर्षक भेटवस्तू व विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहे. या दांडिया महोत्सवात सहभागी होण्यासाठी महिलांनी गोंडस बेबी आणि किड्स शॉप, पी.एम. गोंदकर कापड दुकान, यशवंत मेडिकल शिरोळ या ठिकाणी नाव नोंदणी करावी असे आवाहन रोटरी क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष डॉ. अंगराज माने यांनी केले आहे यावेळी सदस्य अविनाश टारे, युवराज जाधव, दिनेश गावडे, अमित पोतदार, पंडित काळे, मोहन माने, नितीन शेट्टी, चिंतामणी गोंदकर, प्रतापसिंह देसाई, शिवराज महात्मे, सुनील बागडी, सचिन देशमुख आदी उपस्थित होते. शहरात प्रथमच होणाऱ्या दांडिया महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दांडिया महोत्सवात महिलांना धमाल व मजा करता यावी यासाठी आर. जे. पूर्वा (ग्रीन एफ. एम.) आणि एम फैयाज यांना सूत्रसंचालनासाठी निमंत्रित केले आहे. यामुळे दांडिया महोत्सवाची रंगत वाढणार आहे.


