माधुरी हत्तीण प्रकरणी पुढील सुनावणी १४ ऑक्टोबरला महाराष्ट्रसह कर्नाटक सीमाभागाचे लक्ष

माधुरी हत्तीण प्रकरणी
पुढील सुनावणी १४ ऑक्टोबरला
महाराष्ट्रसह कर्नाटक सीमाभागाचे लक्ष…
जयसिंगपूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
नांदणी (ता.शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठ, राज्य सरकार व वनतारा यांच्यावतीने उच्चस्तरीय समितीकडे गुरुवार सायंकाळी सात वाजता ऑनलाईन पद्धतीने सुनावणी संपन्न झाली. यात उच्चस्तरीय समितीने ६ ऑक्टोबर पर्यंत नांदणी मठ आणि वनतारांकडून नांदणी येथे उभारण्यात येणाऱ्या हत्ती पुनर्वसन केंद्रात कोणत्या सुविधा होणार आहेत याची माहिती द्या असा आदेश दिला आहे. त्याचबरोबर पुढील सुनावणी 14 ऑक्टोबरला होणार आहे.
नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या महादेवी हत्तीणप्रकरणी उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करण्यात आला होता.यावर गुरुवारी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन पद्धतीने सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी नांदणी मठाचे विश्वस्त व वकील, वनताराचे वकील, महाराष्ट्र शासनाचे वकील आणि पेटाचे वकील यांनी आपापल्या बाजू मांडल्या.
यावेळी उच्चस्तरीय समितीने नांदणी येथे ६ एकर जागेत पुन्हा वनतारांकडून उभारण्यात येणाऱ्या हत्ती केंद्रात कोणत्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत याची नांदणी मठ व वनताराकडून संयुक्त माहिती ६ ऑक्टोबर पर्यंत द्यावी. तसेच पेटा संस्थेला काही म्हणणे मांडायचे असेल तर त्यांनी १० ऑक्टोबरपर्यंत आपले म्हणणे मांडावे असेही उच्चस्तरीय समितीने सांगितले. दरम्यान याबाबत पुढील सुनावणी १४ ऑक्टोबरला होणार आहे. याकडे महाराष्ट्रसह कर्नाटक सीमाभागाचे लक्ष लागून राहिले आहे. या सुनावणीप्रसंगी वकील व नांदणी मठाचे विश्वस्त उपस्थित होते.


