आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांचे हित हेच आमचे ब्रीद या विचाराने कारखाना कार्यरत:उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांचे प्रतिपादन 

शेतकऱ्यांचे हित हेच आमचे ब्रीद या विचाराने कारखाना कार्यरत:उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांचे प्रतिपादन 

 

श्री दत्त-शिरोळ चा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ उत्साहात संपन्न

 

शिरोळ:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
   येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२०२६ या सालाचा ५४ वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर उद्योग समुहाचे प्रमुख उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, कारखान्याचे चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुशीला पाटील यांच्या शुभहस्ते विधीवत सकाळी ९-३० वाजता ऊर्जांकुर श्री दत्त पॉवर कंपनीच्या कार्यस्थळावर संपन्न झाला. 
यावेळी बोलताना संचालक गणपतराव पाटील म्हणाले, श्री दत्त उद्योग समुहावर आपण प्रेम करणारी महाराष्ट्र-कर्नाटक भागातील सभासदबंधू मंडळी, कार्यकर्ते, हितचिंतक मनापासून आणि उत्साहात या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू राहणार असून “शेतकऱ्यांचे हित हेच आमचे ब्रीद” या तत्त्वावर कारखान्याची प्रगती पथावर वाटचाल सुरू आहे असे त्यांनी खासकरुन नमूद केले. तसेच याप्रसंगी त्यांनी सर्व सभासद बंधूंनी आपला सर्व ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन केले.
    यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, अरुणकुमार देसाई, संचालिका विनया घोरपडे, संचालक अनिलकुमार यादव, बाबासाो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, अ‍ॅड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगु माने-गावडे, रणजित कदम, इंद्रजीत पाटील, महेंद्र बागे, ज्योतिकुमार पाटील, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, संचालिका सौ. संगिता पाटील-कोथळीकर, सौ. अस्मिता पाटील, विजय सुर्यवंशी, मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील-हालसवडे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर मेस्त्री, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. तसेच श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर व त्यांचे पदाधिकारी, शर्करा आद्योगिक श्रमिक संघ व कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी, डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगांव बँकेचे सर्व संचालक, दत्त भांडारचे सर्व पदाधिकारी तसेच उद्योगपती अशोकराव कोळेकर, महादेव कुलकर्णी, पंडितराव काळे, रावसाहेब चौगुले, मुसा डांगे, संजय पाटील कोथळीकर, बापूसाहेब गंगधर, बाळासाहेब कोळी यांचेसह सभासद बंधू, कार्यकर्ते, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??