गडहिंग्लज नगरपरिषद प्रभाग ३ अ ची निवडणूक स्थगित; उमेदवारांचे धाबे दणाणले निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार निर्देश!

गडहिंग्लज नगरपरिषद प्रभाग ३ अ ची निवडणूक स्थगित; उमेदवारांचे धाबे दणाणले निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार निर्देश!
गडहिंग्लज: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क.
गडहिंग्लज नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग 03–अ या जागेची निवडणूक सध्या स्थगित करण्यात आली आहे. येथील मतदान १२डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया कालावधीत तांत्रिक कारणावरून या प्रभागातील ३ अ जागेसाठी जिल्हा न्यायालयात अपिल करण्यात आल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक स्थगित करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेत शेळके यांनी सांगितले. निवडणुक स्थगित करण्यात आल्यामुळे ३ अ च्या उमेदवाराचें मात्र धाबे दणाणले आहेत.
निवडणुक विभागाच्या निर्देशानुसार. नगराध्यक्षपदाची व प्रभाग 03–ब या जागेचीही निवडणूक नियोजित वेळेनुसार दि. 2 डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.त्यामुळे प्रभाग 03–ब तसेच नगराध्यक्ष पदासाठी पात्र असलेल्या सर्व मतदारांनी दि. 2 रोजी मतदानासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणुकीत झालेल्या या बदलामुळे प्रभाग 03–अ मधील मतदारांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित राहील. बाकी सर्व निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसार पार पडतील. असेही निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणूक अर्ज दाखल केलेल्या गौरी चंद्रकात सावंत यांनी तांत्रिक कारणावरून चैत्रा काशिनाथ गवळी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत जिल्हा न्यायालय तसेच गडहिंग्लज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्या तांत्रिक कारणातून ३ अ ची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.



