साहित्य संमेलने हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव : ज्येष्ठ साहित्यिक डॉ.मोहन पाटील.
सांगली येथे नामदेव चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलन उत्साहात.

साहित्य संमेलने हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव : ज्येष्ठ साहित्यिक डॉ.मोहन पाटील. सांगली येथे नामदेव चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलन उत्साहात.
मिरज : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक अंग आहे असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.मोहन पाटील यांनी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा व शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नामदेव चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलनात बोलताना व्यक्त केले ते पुढे म्हणाले त्यात साहित्य संमेलन एक महत्त्वाचे संमेलन आहे.संमेलनाशिवाय साहित्याचा जागर होत नाही. संमेलन लिहिणाऱ्यांना लिहिण्याची प्रेरणा देण्याचे काम करते. महाराष्ट्राच्या विविध भागात खेडोपाडी साहित्य संमेलने भरतात हे महाराष्ट्राचे वैभव आहे.आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, शब्दांगण संस्था यासारख्या अनेक संस्था यामध्ये मनापासून काम करत आहेत त्यामुळे माणसांची मने शुद्ध होत आहेत,विकसित होत आहेत.
यावेळी उद्घाटक म्हणून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे साहित्य हे माणसाला आनंद देते त्यामुळे आपण पुस्तके वाचली पाहिजेत.साहित्य संमेलनामुळे प्रबोधनाचे काम होत आहे. यावेळी कवी धनदत्त बोरगावे यांच्या ‘सुख स्वप्नांचा झुला ‘या कवितासंग्रहाचे प्रकाशन मोहन पाटील यांच्या हस्ते व डॉ. हर्षवर्धन भोसले यांच्या ‘होमिओपॅथी माईंड इंडेक्स ‘या पुस्तकांचे प्रकाशन डॉ शिरीष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच नामदेव भोसले स्मृती पुरस्कारांचे वितरण डॉ मोहन पाटील, स्मृती पाटील व गौतमिपुत्र कांबळे, डॉ. शिरीष चव्हाण , यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये पत्रकार लेखक व सामाजिक कार्यकर्ते सुनील इनामदार, पत्रकार व इतिहास संशोधक मानसिंग कुमठेकर, निसर्ग प्रेमी व वन्यजीव मित्र प्रदीप सुतार व मिरज येथील मिरज विद्यार्थी संघ ही संस्था यांचा समावेश होता शब्दांगण साहित्य पुरस्कार वितरण गौतमीपुत्र कांबळे, डॉ. विनोद परमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये चैतन्य माने पुरस्कार ‘दिवस कातर होत जाताना’ या धर्मवीर पाटील यांच्या कवितासंग्रहास, तर विवेक माने स्मृती पुरस्कार’ वसप’ या महादेव माने यांच्या कथासंग्रहास देण्यात आला. ऋजुता माने स्मृती पुरस्कार डॉ. सोनिया कस्तुरे यांच्या ‘नाही उमगत ती अजूनही ‘या कवितासंग्रहास देण्यात आला. शब्दांगण विशेष साहित्य पुरस्कार प्रा. एम. एस. राजपूत यांच्या’ किमयागार’ या आत्मचारीत्रास व विजय माळी यांच्या ‘ऊस पिकासाठी ठिबक सिंचन’ या पुस्तकास देण्यात आला. यावेळी अ. भा. नाट्यपरिषद मिरज शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. विजय माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत डॉ. विजय माने यांनी केले. तर प्रास्ताविक भीमराव धुळूबुळू यांनी केले.यावेळी डॉ प्रताप भोसले. नगरसेविका विद्याताई नलावडे महेश कराडकर, सुधीर कदम,अभिजित पाटील मनोरमा भोसले, प्रणव माने रघुवीर चव्हाण, इमाम पटेल, शांताराम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. संयोजन संजय मरडी व रमेश हेगाणा यांनी केले. बसगोंड कबाडे यांनी आभार मानले.तर सूत्रसंचालन नाना हलवाई यांनी केले. सुरवातीस लता ऐवळे कदम यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या झालेल्या कविसंमेलनाचे उदघाटन स्वागतध्यक्ष रियाज मुजावर यांनी केले. या संमेलनात लवकुमार मुळे, डॉ स्वाती पाटील, विवेक वैद्य, प्राचार्य सदाशिव भोसले,आनंदहरी, मोहन राजमाने, नंदिनी पाटील साळुंखे, आदी तीस कवींनी भाग घेतला. कविसंमेलनाध्यक्ष लता ऐवळे कदम म्हणाल्या कविता ही सहज सुचली पाहिजे ती वास्तवातून आलेली असावी. त्यांच्या ‘बाप ‘ व ‘धागा ‘ या कवितांना उपस्थित रसिकांची उस्फूर्त दाद मिळाली.



