आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

संजीवनचा फुटबॉल संघ राष्ट्रीय स्तरावर अजिंक्य.

संजीवनचा फुटबॉल संघ राष्ट्रीय स्तरावर अजिंक्य.


क्लस्टर फुटबॉल सामन्यात देदीप्यमान यश

 



पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
येथील संजीवन पब्लिक स्कूल ( सी. बी. एस. ई. ) या निवासी प्रशालेमधील खेळाडूंनी भोपाळ येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद मिळवून देशपातळीवर अजिंक्यपद मिळवले.
सी. बी. एस. ई. च्या 14 वर्षाखालील क्लस्टर फुटबॉल सामन्यात देशभरामधून तब्बल 24 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धा प्रथम लीग व नंतर बाद पद्धतीने घेण्यात आल्या. दिल्ली पब्लिक स्कूल विरुद्ध 8-0, आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध 2-0, अपेक्स इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध 3-0, राजेंद्र अकॅडमी तामिळनाडू विरुद्ध 0-0 सामना बरोबरीचा झाला. उपांत्यपूर्व फेरीत मैदान पब्लिक स्कूल झारखंड विरुद्ध 3-0, सेमी फायनल मध्ये दालमिया विद्यामंदिर विरुद्ध 6-0 अशाप्रकारे सर्व साखळी सामन्यामध्ये संजीवन ची विजयी घोडदौड अखंडपणे सुरू राहिली. अंतिम सामना राजेंद्र अकॅडमी तामिळनाडू विरुद्ध खेळून 3-0 ने जिंकून संजीवनचे फुटबॉलपटू राष्ट्रीय पातळीवर अजिंक्य ठरले.
संजीवनच्या संघाची स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली.

संजीवनच्या फुटबॉल संघातील सर्व खेळाडू विजयाचे शिल्पकार ठरले. विजयी खेळाडूंना संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी. आर. भोसले, सह-सचिव एन.आर.भोसले, कार्यकारी संचालक सौरभ प्रकाश भोसले, संजीवन पब्लिक स्कूलचे प्राचार्य बी. आर. बेलेकर यांचे प्रोत्साहन आणि क्रीडाशिक्षक जयंत कुलकर्णी, संदीप जाधव, प्रकाश जाधोर, अमित साळोखे,आणि नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
संजीवन शिक्षण समूहाने कोल्हापूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्र राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रामध्ये उज्वल केल्याबद्दल राज्यभरातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून संजीवनच्या क्रीडा विभागाचे अभिनंदन होत आहे. देशपातळीवर प्राप्त केलेल्या या विजयामुळे संजीवनच्या या सर्व यशस्वी खेळाडूंची भव्य मिरवणूक संजीवन प्रांगणामध्ये जल्लोषामध्ये काढण्यात आली. त्यामुळे या संजीवन ज्ञान प्रांगणामध्ये आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??