राष्ट्रीय हाॅकी स्पर्धेत संजीवनच्या संघाना रौप्य व कास्यपदक

राष्ट्रीय हाॅकी स्पर्धेत संजीवनच्या संघाना रौप्य व कास्यपदक
पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
मध्य प्रदेश येथील भोपाळ येथे दिनांक 10 ते 16 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या सीबीएसईच्या राष्ट्रीय हाॅकी स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले गटात संजीवन पब्लिक स्कूल कोल्हापूर महाराष्ट्र संघाने साखळी फेरीत तामिळनाडू,दिल्ली व उत्तराखंड संघाचा पराभव केला.उपांत्य सामन्यात ओमान संघाचा 2-0 गोलने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला
अत्यंत चुरशीने झालेला अंतिम सामना संजीवन पब्लिक स्कूल महाराष्ट्र विरूद्ध ओ.पी.जिंदाल स्कूल छत्तीसगड यांच्यात पूर्ण वेळेत १-१ गोलने बरोबरीत सुटला पेनल्टी शूटआऊट वरही सामना ३-३ गोलने बरोबरीत राहिला अखेर सडनडेथवर छत्तीसगड संघाने 0 -1 गोल ने विजय मिळवत अजिंक्यपद मिळविले.त्यामुळे संजीवनला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
तसेच 17 वर्षांखालील मुले गटातही संजीवन पब्लिक स्कूल कोल्हापूर महाराष्ट्र संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
उपविजेत्या संजीवनच्या हाॅकी संघात – यशवर्धन लायकर (कर्णधार), वेदांत इंगळे,अधिराज पाटील, वेदांत जाधव,आर्यंन चव्हाण, रणवीर जाधव, शार्दुल देवकर,विराज लगड आराध्य जाधव, शौर्य बर्गे,यश दिवेकर,स्वराज ताटे मल्लिकार्जुन कोडीयाळ, मेघराज ढमाळ या खेळाडूंचा समावेश होता.
या विजयी संघास हाॅकी प्रशिक्षक गणेश पोवार, नचिकेत जाधव प्रमोद काळे व क्रीडा शिक्षक प्रकाश जाधोर यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन पी.आर.भोसले, सहसचिव एन.आर.भोसले, क्रीडा विभाग प्रमुख सौरभ भोसले, प्राचार्य बी.आर. बेलेकर यांचे प्रोत्साहन लाभले.


