तहसीलदार कार्यालय ते दत्त कारखाना रस्ता ताबडतोब दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन

तहसीलदार कार्यालय ते दत्त कारखाना रस्ता ताबडतोब दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन
शिरोळ -एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शिरोळ तहसीलदार कार्यालय ते विजयसिंह नगर पासून दत्त साखर कारखान्याकडे जाणारा रस्ता हा पूर्णपणे खराब झाला असून गेले अनेक दिवस मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही.या मार्गावरून साखर कारखान्याची वाहने मोठ्या प्रमाणावर जातात तसेच येथे असणाऱ्या मोठ्या वस्तीमुळे रहदारी जास्त आहे .त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे तरी हा रस्ता पूर्णपणे साईड पट्ट्यांसह दुरुस्त करण्यात यावा अन्यथा या भागातील नागरिकांना तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा इशारा समतानगर व परिसरातील नागरिकांनी शिरोळ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या महत्त्वाच्या मागणीबरोबरच समता नगर येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता आहे तसेच फवारणी वेळेवर होत नाही याची दखल नगरपालिकेने घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे. या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी अत्यंत कमी दाबाने मिळत असून तातडीने या विभागात स्वतंत्र पाण्याची टाकी उभारावी अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. समता नगर वरून अतिउच्च दाबाची विजेची वाहिनी गेलेली आहे. त्यामुळे अपघात होऊन एकाला अपंगत्व आलेले आहे .त्यामुळे ही उच्च दाबाची विद्युत तार त्वरित हलविण्यात यावी अशा अनेक मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मुख्याधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये समता नगर रहिवासी मंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर सकट ,सेक्रेटरी भाऊसाहेब कदम गुरुजी ,दिनकर भाट, सहदेव कांबळे ,वराळे ,शंकर मोरे आदींचा समावेश होता.


