क्राईम न्युजताज्या घडामोडी

मिरजेत एक कोटीच्या बनावट नोटा जप्त : वितरण करणाऱ्यासह छपाई करणारी टोळी जेरबंद – कोल्हापूर जिल्ह्यात पाळेमुळे 

मिरजेत एक कोटीच्या बनावट नोटा जप्त : वितरण करणाऱ्यासह छपाई करणारी टोळी जेरबंद – कोल्हापूर जिल्ह्यात पाळेमुळे 

 एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क / मिरज

  मिरजेत बनावट नोटांचे वितरण करणाऱ्या इसमावरवर पोलिसांची धाड टाकून बनावट नोटा पकडल्या. छपाई कारखाण्यासह टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.एक कोटी रू च्या नोटा व मद्देमाल जप्त केला असून आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

श्री. संदीप घुगे, पोलीस अधिक्षक सांगली, . श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक, श्री. प्रणित मिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष सूचना देवून महाराष्ट्र राज्यात आगामी काळात पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालीका यांच्या निवडणुकांचे अनुषंगाने बनावट नोटांचे उत्पादन, छपाई, साठा, चिक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांची माहीती घेवून त्यांचेविरुध्द प्रभाची कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यावाचत आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत बनावट नोटांचे उत्पादन, छपाई, साठा तसेच वितरण करणारे इसमांची माहीती उपलब्ध करुन त्यांचेवर प्रभाची कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सुचित केले होते.

दि. ०८.१०.२०२५ रोजी श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांना, एक इसम त्याचे कब्जात बनावट नोटा बाळगून निलजी-धामणी रोड, कोल्हापूर ब्रीजखाली, मिरज येथे आला असल्याची खात्रीशीर गोपनीय माहीती प्राप्त झाली. सदर बातमीचरुन संदीप शिवे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड व नमूद पोलीस पथक यांना रवाना करुन सदर इसमावर छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांचे नेतृत्वाखाली नमूद पोलीस पथक हे पंच व फोटोग्राफर यांचेसह मिळाले बातमीप्रमाणे निलजी-बामणी रोड, कोल्हापूर ब्रीजखाली, मिरज येथे जावून तेथे सापळा रचून पाहणी करत थांबले असता सदर कोल्हापूर ब्रीजचे खाली एक इसम संशयतरीत्या पुटमळत  थांबलेला दिसला. त्याच्याकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाणेची संधी न देता शिताफीने ताब्यात घेवून त्याचेवर कायदेशीर कारवाई करीत संशयित इसम १) सुप्रीत काळप्पा देसाई, वय २२, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यास ताब्यात घेवून त्याची झडती घेताली त्याचे पेंटचे खिशात भारतीय ५००/- रु. मुल्याच्या चलनी नोटासारख्या दिसणा-या ४२,०००/- रु. किमतीच्या एकूण ८४ बनावट नोटा मिळून आल्या. पथकाने सदरच्या बनावट नोटांची मूळ भारतीय चलनातील नोटेशी तुलना करता सदरच्या नोटांचे कागद, रंग, हिरचे रंगाची स्ट्रीप व महात्मा गांधीजी यांचा वॉटरमार्क हे मिळते जुळते नसल्याचे निदर्शनास आले. यावरुन बातमीची खात्री झाल्याने सदर संशयीत इसम सुप्रीत काड़ाप्पा देसाई, वय २२, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर याचेविरुध्व गुन्हा दाखल करुन त्यास अटक करून त्याचेकडे तपास केला असता, सदरच्या बनावट नोटा या यातील आरोपी क्र. २) राहुल राजाराम जाधव, वय ३३, रा. लोकमान्य नगर, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर हा तयार करीत असून सदरच्या बनावट नोटा या त्याचेकडून घेवून त्या आरोपी क्र. १) सुप्रीत देसाई, वय २२, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, ३) इब्रार आदम इनामदार, वय ४४, रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, कसबा बावडा, जि. कोल्हापूर व ४) नरेंद्र जमवाध शिवे, यय ४०, रा. वनश्री अपार्टमेंट, टाकळा, राजारामपुरी, कोल्हापूर यांचे मार्फतीने महाराष्ट्र राज्यातील विविध भागात वितरीत करीत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस पथकाने . वरिष्ठांच पूर्वपरवानगीने यातील आरोपी क्र. २) राहुल राजाराम जाधव, वव ३३. रा. लोकमान्य नगर, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याचा शोध घेवून त्यास कोल्हापूर शहरातील मुख्य मार्केट परीसरातील रुईकर कॉलनी येथील त्यांचे बनावट नोटा तयार करण्याचे कंपनीचे ऑफीसमधून ताब्यात घेवून तेथे भारतीय ५००/- रु. मुल्याच्या चलनी नोटासारख्या हुबेहुच दिसणा-या ३४,०००/- रु. किमतीच्या एकूण ६८ बनावट नोटा व सदरच्या बनावट नोटांची छपाई करण्यासाठी वापरण्यात येणारे १,०७,६००/- रु. किमतीचे लॅपटॉप, प्रिंटर व इतर साहीत्य मिळून आले असून त्यास तसेच आरोपी क्र. १) सुप्रीत देसाई, . गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यास सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करुन . न्यायालयात हजर केल असता न्यायालयाने त्यांना दि. ११.१०.२०२५ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

सदर पोलीस कोठडीत त्यांचेकडे तपास करून इतर आरोपी नामे १) इवार आदम इनामदार, कोल्हापूर व २) नरेंद्र जगन्नाथ शिवे, कोल्हापूर यांचे ठावठिकाणाचचत माहीती घेवून व गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेेेेेेेेल्या माहितीवरून त्यांना पूर्ण-बैंगलोर हायवेवरील पेठनाका ते कासेगांव शोध घेवून ताब्यात घेतले असता त्यांचे जवळील विना नंबरप्लेट टोयोटा इनोव्हा या चारचाकी गाडीत भारतीय ५०० च्या चलनी नोटासारख्या दिसणा-या ९७,६७,५००/- रु. किमतीच्या एकूण १९,५३५ बनावट नोटा व भारतीय दराच्या चलनी नोटासारख्या दिसणा-या ८५,८००/- रु. किमतीच्या एकूण ४२१ बनावट नोटा असा एकूण १८,५३,२००/- रु. वराच्या चनावट नोटा मिळून आल्या असून त्यांचेसोबत सदर ठिकाणी आलेला इतर संशयीत इराम सिध्देश जगदीश म्हात्रे, चय ३८, रा. ए.के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंचई यास देखील सदर पोलीस पथकाने ताब्यात घेवून त्यांच्या जवळील बनावट नोटा, लॅपटॉप, बिना नंबरप्लेट इनोव्हा चारचाकी गाडी व इतर साहित्य असे एकूण १०९,२३,३००/- रु. किमतीचे साहीत्य जप्त करुन संशयीत इसमांना सदर गुन्हयाचे तपासकामी अटक केली असून यातील आरोपी क्र. २) राहूल राजाराम जाधव, ३३, रा. लोकमान्य नगर, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याचेवर यापूर्वी परराज्यात तसेच इतर पोलीस ठाणेत गुन्हे दाखल असलेचे माहीती प्राप्त झाली असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न होत आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरजचे प्रभारी अधिकारी श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.

महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज कडून महाराष्ट्र राज्यात आगामी काळात पार पडणा-या स्थानिक स्वराज्य संस्था प महानगरपालीका यांच्या निवडणुक अनुषंगाने बनावट नोटांचे उत्पादन, छपाई, साठा, विक्री तसेच वितरण करुन भारतीय अर्थव्यवस्था खिळ‌खिळी करणा-या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढणेच्या अनुषंगाने सदरचे कारवाईत सातत्य राखून जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करुन सदर अवैध व्यवसायाचा समूळ बीमोड करण्याच्या उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी अशा अवैध व्यवसायाची माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??