आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या तारखा जाहीर

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या तारखा जाहीर.

एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या तोंडी, प्रायोगिक व प्रकल्प मूल्यांकन यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे.                           
बारावी व दहावी तोंडी परीक्षांचे वेळापत्रक :     बारावीच्या (१२ वी) तोंडी, प्रात्यक्षिक, श्रवण व वाचन अशा अंतर्गत परीक्षा सोमवार, १० फेब्रुवारी २०२५ पासून शनिवार, १८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.                  तर दहावीच्या (१० वी) तोंडी परीक्षा शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५ पासून मंगळवार, १८ मार्च २०२५ या कालावधीत होतील.
NSQF व इतर महत्त्वाच्या मूल्यांकन परीक्षा
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी NSQF अंतर्गत कौशल्य विषयाच्या आणि इतर मूल्यांकनाच्या परीक्षा देखील याच कालावधीत घेण्यात येणार आहेत. शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी वेळापत्रकानुसार तयारी करावी व परीक्षांचे सुयोग्य आयोजन करावे, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत.
संपूर्ण राज्यातील संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांसाठी वेळेवर तयारीसाठी आवश्यक व्यवस्था कराव्यात, असे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे. परीक्षांबाबत अधिक माहितीसाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा असेही मंडळामार्फत सांगण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना आता तोंडी आणि प्रायोगिक परीक्षांची निश्चित तारीख समजल्यामुळे अभ्यासाचे नियोजन करणे सुलभ होणार आहे. तसेच शाळांनासुद्धा वेळापत्रकानुसार आवश्यक ती पूर्वतयारी व विद्यार्थ्यांकडून प्रकल्प, प्रात्यक्षिके पूर्ण करून घेता येतील.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??