ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल मानद पदवी
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क:
ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राला भारतीय सैन्याने लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी बहाल केली आहे. नवी दिल्ली येथे २०२५ मध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात नीरज चोप्राला सैन्याच्या विशेष गणवेशात ही पदवी सज्ज करण्यात आली. या वेळी संरक्षण मंत्री आणि सैन्यप्रमुख उपस्थित होते.नीरज चोप्रा याने २६ ऑगस्ट २०१६ रोजी भारतीय सैन्याच्या सूबेदार पदावर नियुक्ती झाली होती. टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्यानंतर त्याला प्रमोशन देण्यात आले. नीरज चोप्रा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भालाफेकपटू आहे. त्यांनी आजपर्यंत दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिंकले आहे.आर्मीमध्ये सहभागी झाल्यानंतर नीरजने क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. भारतीय सैन्यातून त्याच्या कर्तृत्वाची दखल घेत ही मानद पदवी देण्यात आली. त्यांच्या या यशाने देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??