आपला जिल्हाताज्या घडामोडी

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत. माजी आमदार उल्हास पाटील यांचा उपक्रम : कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन 

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत. माजी आमदार उल्हास पाटील यांचा उपक्रम : कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन 

शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शिरोळ तालुक्याचे माजी आमदार कार्यसम्राट उल्हास पाटील यांचा २७ ऑक्टोबरला वाढदिवस आहे. दरवर्षी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. मात्र, यावर्षी वाढदिवस कोणताही अनावश्यक खर्च न करता साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्ताने होणारा खर्च टाळून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे यासाठी कार्यकर्त्यांनी मदत करावी, असे आवाहन उल्हास पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

 उल्हास पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्यात गेल्या काही वर्षांत मोठे महापूर आले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ येथे आला होता. त्या मदतीची उतराई करण्याची वेळ आता आली आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. त्यांना सर्वतोपरी मदतीची गरज आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी हार, गुच्छ, तुरे न आणता त्याऐवजी शैक्षणिक साहित्य व आवश्यक वस्तू देऊन वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. त्यांच्या या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी स्वागत करून उल्हास पाटील यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला माजी सभापती कमरुद्दिन पटेल, रमेश माने, एल एफ पाटील ,रावसाहेब माने, संजय माने यांसह उल्हासदादा प्रेमी आणि गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील काही गावात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्या भागातील काही लोकांच्या संपर्कात असून तेथील गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जमेल तितकी मदत पूरग्रस्तांसाठी करावी, असेही आवाहन यावेळी उल्हास पाटील यांनी केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??