क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

ज्येष्ठ अभिनेते, विनोदी कलाकार सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन 

ज्येष्ठ अभिनेते, विनोदी कलाकार सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन 

मुंबई: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क 

ज्येष्ठ अभिनेते, विनोदी कलाकार आणि ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम सतीश शाह यांचे २५ ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या ७४व्या वर्षी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. गेल्या काही काळापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि उपचार सुरू असतानाच दुपारी २.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपट आणि टीव्ही सृष्टीत शोककळा पसरली असून, अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.सतीश शाह यांनी ‘जाने भी दो यारो’, ‘हम साथ साथ है’, ‘मैं हूँ ना’, ‘ओम शांती ओम’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘ये जो है जिंदगी’ या चित्रपट-मालिकांसह मराठी सिनेमातही लक्षवेधी भूमिका साकारल्या. विनोदी अभिनय आणि अफलातून टायमिंगसाठी ते कायम ओळखले गेले. त्यांच्या निधनाची माहिती दिग्दर्शक अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर दिली. त्यांच्या पार्थिवावर २६ ऑक्टोबर रोजी बांद्रा, कलानगर येथील राहत्या निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

सतीश शाह यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत. गम्मत जम्मत (1987) गोळाबेरीज (2012) मला घेऊन चला (1988) या चित्रपटातही सतीश शाह यांनी अभिनय केला आहे, वरील चित्रपटांमध्ये सतीश शाह यांच्या विनोदी आणि लक्षवेधी अभिनयाने मराठी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??