आपला जिल्हाताज्या घडामोडी

सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न : अमरसिंह पाटील/काळे समाजाचे मूळ पुरुष येसाजी काळे समाधी स्थळाचे लोकार्पण

सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न : अमरसिंह पाटील/काळे समाजाचे मूळ पुरुष येसाजी काळे समाधी स्थळाचे लोकार्पण

शिरोळ  :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात राजकारण गट-तट न पाहता शिरोळ शहरातील विविध विकास कामे पूर्ण करून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळेच शहरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे पूर्ण झाली. जनतेच्या पाठबळावर यापुढेही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहून असे प्रतिपादन शिरोळचे माजी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले. 

   येथील समस्त काळे समाजाचे मूळ पुरुष येसाजी काळे यांच्या समाधी स्थळ व सुशोभीकरणाचे लोकार्पण सोहळा सोमवारी रात्री संपन्न झाला यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील बोलत होते. 

येसाजी काळे समाधी स्थळासाठी जागा उपलब्ध करून समाधी स्थळ बांधून त्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल काय समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ह. भ. प. श्रीरंग काळे, महेश काळे, प्रदीप खाडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अमरसिंह पाटील यांनी एका ध्येयाने शिरोळचा विकास साधला. कर्मयोगी आणि ध्येयवेडा माणूसच समाजाचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी पुढाकार घेत असतो आणि तेच काम अमरसिंह पाटील यांनी केले. त्यामुळे शहराचा चौफेर विकास झाला. अमरसिंह पाटील यांच्या कार्यपद्धतीला जनतेचे हे पाठबळ असल्याने सार्वजनिक जीवनातील यशस्वी होऊ शकले. काळे समाज त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहील असे आश्वासित केले. 

यावेळी माजी सरपंच अर्जुन काळे, उल्हास पाटील, प्रवीणसिंह माने, किरण गावडे, एन. वाय. जाधव, रावसाहेब पाटील मलिकवाडे,काळे समाजाचे शिवाजी काळे, नारायण काळे, अशोक काळे, दौलत काळे,दत्तात्रय काळे, अरविंद काळे, किसन काळे, विशाल काळे, विजय काळे, आनंदा काळे, सचिन काळे, दरगू काळे, यांचेसह समाज बांधव व शिरोळ परिसरातील आजी-माजी पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन दीपक काळे यांनी केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??