संगीता दगडू माने यांनी नगराध्यक्ष पदासाठी भरला अपक्ष अर्ज – काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असा ठाम विश्वास.

संगीता दगडू माने यांनी नगराध्यक्ष पदासाठी भरला अपक्ष अर्ज – काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असा ठाम विश्वास.
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्या संगीता दगडू माने यांनी नगराध्यक्षपदाचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्याकडे उमेदवार संगीता माने यांच्यासह लता जाधव ,लता मराठे यांनी हा अर्ज सुपूर्द केला.
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, दत कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील , शिरोळ तालुका नेते अनिलराव यादव, युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव, माजी खासदार राजू शेट्टी, दरगु गावडे यांची भेट घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली असून नेत्यांची सकारात्मक भूमिका आणि मतदारांतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काँग्रेस पक्षाकडून मलाच उमेदवारी मिळणार असा ठाम दावा संगीता माने यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
शिरोळ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संगीता माने व त्यांच्या समर्थकांनी येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजे शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी चौकातील तख्त येथे छत्रपती ताराराणी व छत्रपती राजाराम महाराज यांच्या गादीला तसेच माजी आमदार कै दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याचवेळी डॉ. दगडू माने यांनीही प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अर्ज भरण्यासाठी डॉ दगडू माने ,राजेंद्र दाभाडे, लता जाधव ,शिवाजी पाटील – कौलवकर, राजाराम माने ,अनिता माने ,विजया दाभाडे, लता मराठे, अन्नपूर्णा माने, मिलिंद माने , अजित माने,यशवंत चौगुले, मयूर चव्हाण,जगदीश पाटील, शांताराम रनवरे ,राहुल जाधव, गंगाराम माने ,शरद माने, शंकर माने, सुभाष माने ,प्रथमेश कोळी, शिवराज सुतार ,प्रकाश हेगडे ,रोहन माने ,आर्यन माने, संजय माने ,सनाउल्ला तहसीलदार, मेजर कदम, सुनिता माने यांच्यासह महिला व पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



