आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

रेडियंट स्कुलच्या मुलींच्या संघाची राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी निवड

रेडियंट स्कुलच्या मुलींच्या संघाची राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी निवड

येळवडे :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क. 

सातारा येथे झालेल्या शालेय रग्बी स्पर्धेत येथील रेडियंट स्कुलच्या मुलींच्या संघाची व पाच मुलांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांनी सातारा जिल्हा मुलींच्या संघाला हरवले. पुढील आठवड्यात ठाणे येथे राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत.                                                       महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीने या विभागीय स्पर्धा नुकत्याच पार १४ वर्षांखालील मुलींच्या रग्बी संघाने प्रथम क्रमांक पटकावला. सातारा विरुद्ध कोल्हापूर रेडिएंट संघ अशी लढत झाली. यामध्ये या मुलींनी सहज विजय मिळवला. यासह या गटातील पाच मुलांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

निवड झालेला मुलींचा संघ :  मयुरी पाटील, शुभ्रा जाधव, प्रज्ञा आदिती पाटील, संस्कृती पाटील, श्रेया पाटील, श्रेया दुर्गुळे, श्रावणी पाटील, देवळकर, प्रचिता पाटील, चैत्राली पाटील, आराध्या पाटील,स्वरा पाटील.   

                                 

तर पृथ्वीराज चौगले, वेदांत गुडाळे,कार्तिक पोवार, हर्षद पोवार, रोहित कांबळे या मुलांची राज्य स्तरावर निवड झाली. 

या विद्यार्थ्यांना रेडियंट स्कूल कोदवडेचे मुख्याध्यापक आर. जी. पाटील, संस्थेचे सचिव पत्रकार राजू पाटील क्रीडा शिक्षक संदीप पाटील, यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??