क्रीडा व मनोरंजन

शिरगाव हायस्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींचा संघ लेदर बॉल क्रिकेटमध्ये जिल्हा विजेता- कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

शिरगाव हायस्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींचा संघ लेदर बॉल क्रिकेटमध्ये जिल्हा विजेता- कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

देवगड: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

मालवण येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत, शिरगाव हायस्कूल शिरगाव (ता. देवगड) च्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी करत जिल्हा विजेतेपद पटकावले आहे.

अंतिम सामन्यात शिरगाव हायस्कूलच्या संघाने वैभववाडी संघावर २० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह संघाची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाचे शिल्पकार, संघास मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक व  शिक्षक  सुधीर साटम व  ए. एम. गर्जे यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

विजयी संघ : अनुश्री किरण जाधव, आर्या अभिजित जाधव, गार्गी अजय जाधव, प्रेरणा रविकांत पवार, भूमिका प्रल्हाद कुबडे, मनस्वी मंगेश आहीर.मुक्ता मनोहर पाटील,वैभवी सुहास कदम,श्रावणी दत्ताराम सावंत,श्रुती गुरुनाथ पालयेकर,श्रेया गुरुनाथ पालयेकर सानिका सुधीर पवार,सुकन्या सुरेंद्र पवार,पूर्वा प्रमोद चव्हाण,खुशी संतोष बावकर.                                                 

या दिमाखदार यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री. अरुणभाई कार्ले, शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच, पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??