मेटाची नवी घोषणा: इंस्टाग्राम रील्स आता मराठीतही बोलणार.आकर्षक मराठी फॉन्ट्स आता अँड्रॉइड अॅपमध्ये उपलब्ध होणार.

मेटाची नवी घोषणा: इंस्टाग्राम रील्स आता मराठीतही बोलणार.आकर्षक मराठी फॉन्ट्स आता अँड्रॉइड अॅपमध्ये उपलब्ध होणार.
मुंबई | एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
डिजिटल माध्यमांवरील भारतीय भाषांचा विस्तार आता आणखी वाढणार आहे. मुंबईत झालेल्या “हाऊस ऑफ इंस्टाग्राम” या कार्यक्रमात मेटा प्लॅटफॉर्म्स कंपनीनं भारतीय क्रिएटर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने इंस्टाग्राम आणि फेसबुकसाठी पाच नव्या भारतीय भाषांचा — बंगाली, मराठी, तेलुगू, कन्नड आणि तमिळ — समावेश जाहीर केला आहे.या नव्या सुविधेमुळे दोन्ही प्लॅटफॉर्मवरील कंटेंट क्रिएटर्स आता आपल्या रील्स आणि व्हिडिओ पोस्टांचे स्वयंचलित भाषांतर या पाच भाषांमध्ये करू शकतील. विशेष म्हणजे, यासाठी मेटाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित “ऑटोमॅटिक डबिंग” आणि “लिप-सिंक” तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे फिचर क्रिएटरच्या मूळ आवाजातील स्वर, लय आणि भावना ओळखून नव्या भाषेत त्या अनुरूप आवाज तयार करतं. त्यामुळे भाषांतरानंतरही तोंडाच्या हालचाली आणि आवाज नैसर्गिक दिसतात.आजवर ही सुविधा फक्त इंग्रजी, हिंदी, स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषांपुरती मर्यादित होती. मात्र, आता भारतीय वापरकर्त्यांसाठी स्थानिक भाषांमध्येही डिजिटल ओळख व प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं अधिक सुलभ होणार आहे.मेटा कंपनीनं याच कार्यक्रमात ‘एडिट्स’ या त्यांच्या मोबाईल व्हिडिओ एडिटिंग अॅपसाठीही नव्या फॉन्ट्सची घोषणा केली. असमिया, बंगाली, हिंदी आणि मराठी भाषांसाठी देवनागरी आणि बंगाली-असमिया स्क्रिप्टमधील नवे आकर्षक फॉन्ट लवकरच अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहेत.मेटाच्या या नव्या उपक्रमामुळे भारतातील प्रादेशिक भाषांतील क्रिएटर्सना आपलं कंटेंट आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे मांडता येईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. डिजिटल माध्यमांवर भारतीय भाषांचं बळ वाढवण्याच्या दिशेनं हा मोठा टप्पा मानला जात आहे.



